या कलाकारांसोबत जोडले आहे नोरा फतेहीचे नाव, बिग...

या कलाकारांसोबत जोडले आहे नोरा फतेहीचे नाव, बिग बॉसनंतर मिळाली खरी ओळख (Nora Fatehi’s Name has been Associated with These Actors, Got Real Fame After ‘Bigg Boss’)

कॅनडियन अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेहीने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. नोराच्या प्रत्येक डान्सच्या ठेक्यावर थिरकायला चाहते अगदी उतावीळ झालेले असतात. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त नोराने तेलगु, तमिळ आणि मल्याळम चित्रपटात काम केले आहे. आताच्या काळात नोरा बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. पण तिला खरी ओळख सलमान खानचा वादग्रस्त शो बिग बॉस 9 मुळे मिळाली. याव्यतिरिक्त ती आपल्या अफेअरच्या चर्चांमुळे सुद्धा चर्चेत होती.

नोरा गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम करत असल्यामुळे सध्या ती भारतातच राहते. पण तिचे नागरिक्तव हे टोरंटोचे आहे. तिचा जन्म कॅनडामध्ये झाला. तिने टोरंटोच्या वेस्टव्ह्यू सेंटेनियल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे तिने योर्क विद्यापिठात प्रवेश घेतला. पण तिला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड असल्यामुळे तिने आपले शिक्षण मध्येच सोडले.

नृत्याची आवड असल्यामुळे ती अभ्यासादरम्यान एक प्रोफेशनल डान्सर म्हणून काम करु लागली. कोणतेही शिक्षण न घेता केवळ यूट्यूबमध्ये व्हिडिओ पाहून ती बेली डान्स एक्सपर्ट बनली. डान्स व्यतिरिक्त तिला मॉडेलिंगचीसुद्धा आवड असल्यामुळे तिने एका टॅलेण्ट एजन्सीसोबत डील साइन केली. त्यातल्याच एका कामानिमित्त ती भारतात आली आणि पुढे ती इथेच राहिली.

कॅनेडियन असूनही नोराचे अनेक भाषांवर चांगले प्रभुत्व आहे. तिला इंग्रजी, हिंदी, फ्रेंच आणि अरबी भाषा चांगल्या बोलता येतात. भारतात आल्यानंतर नोराने 2015 मध्ये ‘बिग बॉस 9’ मध्ये भाग घेतला आणि येथूनच तिला खर्‍या अर्थाने ओळख मिळाली. नोरा अजूनही अविवाहित आहे, पण तिच्या मृत्यूची संख्या लाखोंमध्ये आहे. नोरा फतेहीचे नाव प्रिन्स नरुला आणि अंगद बेदी यांसारख्या अभिनेत्यांसोबतही जोडले गेले आहे.

कॅनडियन असूनही नोराचे वेगवेगळ्या भाषांवर चांगले प्रभूत्व आहे. तिला इंग्रजी, हिंदी, फ्रेंच आणि अरेबिक भाषा चांगल्या बोलता येतात. भारतात आल्यावर नोराने 2015 मध्ये बिग बॉस 9 मध्ये सहभाग घेतला होता. तिथूनच तिला खरी ओळख मिळाली. आज तिच्या चाहत्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. नोराचे नाव प्रिन्स नरूला आणि अंगद बेदीसोबत जोडले गेले होते.

नोराही एक उत्कृष्ट बेली डान्सर असून तिने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहे. त्यातील दिलबर दिलबर या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली.

 नोरा फतेही सध्या एका वादामुळे चर्चेत आली आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची अनेक तास चौकशी केली. चौकशीत नोराने  ती सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात होती हे सत्य कबूल केले.

‘बिग बॉस 9’, ‘झलक दिखला जा’ आणि ‘डान्स प्लस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये दिसलेली नोरा फतेहीने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे. सोशल मीडियावरही नोराचे जबरदस्त फॅन फॉलोअरर्स आहेत.