दिलबर गर्ल नोरा फतेही बारमध्ये बनवायची हुक्का, ...

दिलबर गर्ल नोरा फतेही बारमध्ये बनवायची हुक्का, आज आहे करोडोंची मालकीन (Nora Fatehi Used To Make Hookah In The Bar, Today She Is The Mistress Of Crores)

दिलबर गर्ल नोरा फतेही हे सध्या बॉलिवूडमधील सनसनाटी नाव बनलं आहे. नोराने स्वतःच्या मेहनतीने आपली ओळख बनवली आहे. तिने आपल्या आयटम साँगच्या माध्यमातून करोडो लोकांची मने जिंकली आहेत. कॅनडात जन्मलेली नोरा तिच्या डान्स मूव्ह्सवर चाहत्यांना थिरकायला लावते. हार्डी संधूच्या ‘नाह’ गाण्यातून नोराने धमाकेदार एंट्री केली. या गाण्यात नोराचा परफॉर्मन्स सगळ्यांची मनं जिंकणारा होता. या गाण्यानंतर ती टी-सीरीजच्या अनेक गाण्यांमध्ये दिसली. तिला अनेकदा सर्वोत्कृष्ट नृत्यांगनाचा पुरस्कार मिळाला आहे, यावरूनही तिच्या नृत्यकौशल्याचा अंदाज लावता येतो. परंतु तुम्हाला माहीत नसेल हीच नोरा फतेही एकेकाळी पैशांसाठी बारमध्ये हुक्का बनवण्याचे काम करत असे. चला जाणून घेऊया नोरा फतेहीबद्दलच्या काही रंजक गोष्टी.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

नोरा फतेही स्वतः डान्स शिकली आहे. यासाठी तिने कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही, हे फार कमी लोकांना माहीत असेल. नोराने नृत्य क्षेत्रात करिअर करावे असे तिच्या पालकांना वाटत नव्हते. पण आई-वडिलांच्या विरोधात जाऊन नोराने डान्समध्ये करिअर करण्याचा विचार केला आणि आज ती एक यशस्वी डान्सर बनली आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

नोराचे ‘दिलबर’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले. याच गाण्यानंतर ती इंटरनेट सेन्सेशन बनली. नोरा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘झलक दिखला जा’ आणि ‘बिग बॉस’मध्ये दिसली आहे. एकदा नोराच्या फ्लॅटमेटने तिचे २० लाख रुपये चोरले होते. नोराला ते पैसे एका जाहिरातीच्या शूटमधून मिळाले होते.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

सुरुवातीला नोरा फतेहीला तिच्या कॅनेडियन उच्चारणासाठी खूप टोमणे ऐकायला मिळायचे. लोक तिला कॅनडाला परत जाण्याचा सल्ला द्यायचे. पण त्यानंतर ती चांगले हिंदी बोलायला तर शिकलीच शिवाय तिने तिच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांच्या मनावर राज्य करून बोलणाऱ्यांची तोंडं बंद केली. एकेकाळी बारमध्ये हुक्का बनवून पैसे कमावणारी साधी मुलगी आजच्या काळात करोडोंची मालकीन आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

एका रिपोर्टनुसार, नोरा फतेरी एका गाण्यासाठी किमान ४० लाख रुपये घेते. असंही म्हटलं जातं की, जेव्हापासून तिचं ‘गरमी’ हे गाणं हिट झालं तेव्हापासून तिने आपली फी आणखी वाढवली आहे. सोशल मीडियावर कोणत्याही ब्रँडची जाहिरात करण्यासाठी नोरा ५ लाख रुपये घेते. दुसरीकडे, जर आपण नोरा फतेहीच्या नेटवर्थबद्दल बोललो तर, रिपोर्ट्सनुसार, तिची नेट वर्थ १०५ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १२ कोटी आहे. नोरा दरवर्षी सुमारे २ कोटी रुपये कमावते. नोरा फतेहीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.