नोरा – आर्यनचा खासगी फोटो सोशल मीडियावर व...

नोरा – आर्यनचा खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल; दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा (Nora Fatehi Dating Aryan Khan Photo Viral On Social Media)

बॉलिवडमध्ये सतत कोणाचे ना कोणाचे  प्रेमप्रकरण कायम चर्चेत असते. आता हेच पाहा, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अभिनेत्री नोरा फतेही यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा चर्चांना उधाण आलं आहे. खरं तर फोटोमध्ये आर्यन आणि नोरासोबत दोघांचे अन्य मित्र देखील दिसत आहेत. पण आर्यन आणि नोरा यांना एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आर्यन व नोराच्या कॉमन मित्राद्वारे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. नोरा आणि आर्यन यांचे पार्टीतील फोटो व्हायरल होत असल्याने नेटकऱ्यांनी फोटोवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहे.

अलिकडे आर्यनचं नाव अनन्या पांडे बरोबरही जोडलं गेलं होतं पण एका पार्टीमध्ये आर्यनने अनन्याला चक्क इग्नोर केलं होतं.

आता झालं असं की दुबईमध्ये आर्यन खानने न्यू इयरची पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये हार्दिक सिंधूशिवाय त्याचे अनेक मित्र दिसले. नोरादेखील पार्टीमध्ये होती. एका फोटोमध्ये आर्यन दिसत आहे तर दुसऱ्या चित्रात नोरा फतेही आहे. मात्र, या फोटोंमध्ये आर्यन आणि नोरासोबत एकच फॅन दिसत आहे. मग काय, लोकांची नजर त्यावर पडताच दोघेही एकमेकांना डेट करत असून गुपचूप एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नोरा फतेही शेवटची ‘अॅन अॅक्शन हिरो’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर लवकरच ती ‘100 पर्सेंट’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. दुसरीकडे, आर्यन खानने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि सांगितले आहे की त्याच्या डेब्यू प्रोजेक्टची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे आणि तो शूटिंगसाठी उत्सुक आहे.