फक्त 5 हजार रुपये घेऊन भारतात आली होती नोरा फते...

फक्त 5 हजार रुपये घेऊन भारतात आली होती नोरा फतेही, आज आहे करोडोंची मालकीण (Nora Fatehi Came to India with only 5 Thousand Rupees, Today She is The Owner of Property Worth Crores)

आपल्या जबरदस्त डान्सने आणि घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी नोरा फतेही आजची भारतातील एक सुप्रसिद्ध डान्सर, मॉडेल म्हणून ओळखली जाते. पण ती मुळची कॅनेडियन अभिनेत्री आहे. तिचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये येते. अनेक चित्रपटांमध्ये आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी नोरा फतेही आज आलिशान आणि विलासी जीवन जगत आहे. ती फक्त ५ हजार रुपये घेऊन भारतात आली होती, पण आज ती करोडोंच्या संपत्तीची मालक बनली आहे.


नोरा फतेहीने आपल्या मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. नोरा चित्रपटांमधील आयटम नंबरसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिची आयटम सॉन्ग देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
रिपोर्ट्सनुसार, नोरा फतेही फक्त 5,000 रुपये घेऊन भारतात आली होती. या पैशांतून तिने डोळ्यांत अनेक स्वप्ने आणली होती. नोराने तिची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली आणि तिची मेहनत फळाला आली.


नोराचे आज मुंबईत आलिशान घर आहे, ज्याची रचना पीटर मारिनोने केली आहे. नोराच्या या आलिशान घराची किंमत सुमारे 10 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. नोराकडे सर्व अलिशान सुविधांनी सुसज्ज अशी व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. ही बॉलिवूडमधील सर्वात महागडी आणि आलिशान व्हॅनिटी व्हॅनपैकी एक आहे. तिची किंमत सुमारे 5 कोटी आहे.


नोरा फतेही नेहमीच आलिशान कारमधून प्रवास करते. तिच्‍याकडे आलिशान वाहनांचे कलेक्‍शनही आहे, असे सांगितले जाते. याशिवाय नोराकडे सुंदर हँडबॅग्जचेही अप्रतिम कलेक्शन आहे. तिच्या हँडबॅगच्या कलेक्शनमध्ये 7 लाख किमतीची हर्मीस बर्किन्स हँडबॅग देखील समाविष्ट आहे, याशिवाय अभिनेत्रीकडे 5 लाख रुपयांची लुई व्हिटॉन बॅग देखील आहे.
रिपोर्ट्सनुसार, नोरा फतेहीची एकूण संपत्ती 30 कोटी रुपये आहे. तिच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांबद्दल बोलायचे तर नोरा चित्रपटांमधील आयटम नंबर्समधून भरपूर कमाई करते. याशिवाय नोरा ब्रँड, स्टेज शो, मेकअप ब्रँड आणि रिअल इस्टेट व्यवसायातूनही भरपूर कमाई करते.