महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही, आरोग्य...

महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही, आरोग्य मंत्री यांची घोषणा (No Total Lockdown In Maharashtra – Health Minister Declares)

महाराष्ट्रात गेल्या वर्षीप्रमाणे संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार नाही. अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच केली. ज्या गोष्टीबद्दल लोकांमध्ये कालपासून अनेक तर्कवितर्क लढविले जात होते व संपूर्ण लॉकडाऊनची धास्ती घेतली जात होती, त्याला आरोग्य मंत्र्यांच्या या घोषणेने पूर्णविराम मिळाला आहे.

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणे येणे करण्यास मोकळीक राहील. रेल्वेगाड्या व बसेस चालू राहतील. भाजीपाला, किराणा सामान आता फक्त चारच तास चालू राहतील, अशी सध्या स्थिती आहे. परंतु करोनाग्रस्तांचे वाढते आकडे पाहता उद्यापासून पूर्णतः लॉकडाऊन होईल, अशी जी भिती सर्वसामान्य जनतेच्या मनात होती, त्याला आरोग्य मंत्र्यांनी दिलासा दिला आहे. मात्र सध्या लादलेले निर्बंध अधिक कडक करण्याविषयी सरकार दरबारी खल चालला आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.