‘बिग बॉस’ फेम निक्की तांबोळीने विकत घेतली ८६ ला...

‘बिग बॉस’ फेम निक्की तांबोळीने विकत घेतली ८६ लाख रुपयांची नवी मर्सिडीज कार : आपल्या पप्पांसोबत प्रसिद्ध केले फोटो (Nikki Tamboli Buys New Mercedes Benz GLE Worth ₹86 Lakh, Poses In Front Of Car With Her Father)

बिग बॉस कार्यक्रमाची एक स्पर्धक निक्की तांबोळीने अलिकडेच पांढऱ्या रंगाची मर्सिजीड बेन्स जीएलई, ही आलिशान कार खरेदी केली आहे. ही नवी आरामदायी गाडी घेतल्याने निक्कीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. तिनं आपला हा आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्या शो रूममधून तिने ही जीएलई कार घेतली, त्या ठिकाणचे हे फोटो आहेत.

दाक्षिणात्य कलाकार आणि बिग बॉसची एक स्पर्धक असलेल्या निक्कीने या नव्या कारची पूजा केली. कुंकू लावून या कारसोबत छान पोझेस दिल्या. या प्रसंगी तिने केक देखील कापला.

मोटार कंपनीच्या प्रथेप्रमाणे शो रुममध्ये गोल्डन, ग्रे आणि रंगीबेरंगी फुगे लावण्यात आले होते. निक्कीने इथे आपल्या पप्पांसोबत फोटो घेतले. एका फोटोमध्ये ती केक कापून आनंद व्यक्त करते आहे.

हे फोटो शेअर करून निक्की म्हणते, “मला नेहमी उत्तेजन देत कधीच निराश न करणाऱ्यांची मी सदैव आभारी राहीन.” तिच्या या मोटारीची किंमत ८५.८ लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं.

निक्कीच्या चाहत्यांबरोबरच तिचे चित्रसृष्टीतील मित्र जस्मीन भसीन, पवित्रा पुनिया, सुगंधा मिश्रा आणि प्रतीक सहजपाल यांनी या फोटोंवर समाधान व्यक्त केलं आहे. निक्कीने हार्टवाले इमोजी टाकून त्यांना पुष्टी दिली आहे.