प्रियंका चोप्राचे पती निक जोनस रुग्णालयात दाखल…...

प्रियंका चोप्राचे पती निक जोनस रुग्णालयात दाखल… (Nick Jonas Hospitalised After Suffering Injury On Show Set)

बॉलिवूडची अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पती निक जोनसला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निक जोनस अतिशय लोकप्रिय पॉप स्टार आहे, परंतु आपली देसी गर्ल प्रियंका चोप्रासोबत लग्न केल्यानंतर तो अधिकच प्रसिद्ध झाला, असं म्हणण्यास वाव आहे. आता अशी खबर आहे की, निक एका गाण्याच्या रिॲलिटी शोचं शुटिंग करत असताना अपघात होऊन त्याला दुखापत झाली. त्यामुळे निकला लॉस ऐंजेलिस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
१५ मे या दिवशी ही दुर्घटना झाल्यानंतर चाहते अतिशय चिंतेत होते. आता निक घरी आला आहे, परंतु त्याला कोठे आणि किती दुखापत झाली आहे याबाबत अजूनही फारशी माहिती दिली गेलेली नाही.

प्रियंका कामानिमित्त सध्या लंडनमध्ये आहे आणि निकसुद्धा बऱ्याच काळापासून प्रियंकासोबत लंडनमध्येच होता. आता हॉस्पिटलमधून निक घरी आला असून लवकरच तो आपलं शूटिंग सुरु करु करेल असा अंदाज आहे.

Photo Courtesy: Instagram (All Photos)

अलिकडेच निकने आपला नवीन अल्बम ‘स्पेसमॅन’ प्रदर्शित केला होता. तसेच निक आणि प्रियंकाने भारतातील कोविड रुग्णांच्या मदतीसाठी ३ मिलियन डॉलर इतकी रक्कम जमवून पाठवली होती. १ डिसेंबर २०१८ मध्ये प्रियंकासोबत लग्न केल्यानंतर निक संपूर्ण भारताचे भावोजी बनले आहेत. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीबद्दल निकच्या मनात आदर आहे. म्हणूनच लोकांचं त्याच्यावर प्रेम आहे. अन्‌ निकने लवकरात लवकर बरं व्हावं, अशी प्रार्थना सगळ्यांनी केली आहे.