निया शर्मा बोल्ड आणि ब्लॅक जिन्समध्ये (Nia Shar...

निया शर्मा बोल्ड आणि ब्लॅक जिन्समध्ये (Nia Sharma’s Bold Style again; Fans liked the Black Jeans Look)

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक सेक्सी आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी निया शर्मा तिच्या ‘जमाई राजा 2.0’ या वेब सिरिजमुळे सध्या बरीच प्रकाशझोतात आली आहे. याशिवाय इतर वेळीही ती सोशल मीडियावर सक्रीय असतेच. आपल्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनून राहण्यास नियाला आवडते आणि त्यासाठी ती आपले वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करताना दिसते. आताही नियाने ब्लॅक ड्रेसमधील आपले काही फोटो पोस्ट केले आहेत, जे पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांकडून तिला सतत कमेंट्‌स येत आहेत. या फोटोंमधील नियाच्या बोल्ड अवताराने इंटरनेटवर फारच कहर केला आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

काळ्या रंगाची लो वेस्ट जिन्स आणि बोल्ड टॉपमधील नियाने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. तिने आपल्या फोटोंना अशी कॅप्शन दिली आहे की, ‘मुझे ऐसी लड़कियां पसंद हैं जो लिविंग के लिए लोगों को मार देती हैं.’ काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसणाऱ्या नियाने फॅन्सना मार डाला… ची अनुभूती दिली आहे. निया अशा बोल्ड लूकमध्ये पहिल्यांदाच दिसली नसून यापूर्वीही तिने अनेकदा आपले बोल्ड फोटो सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत आणि तिच्या सेक्सी लूकने सोशल मीडियावर आग लावली आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

निया शर्माला आपला बोल्डनेस दाखवताना कित्येकदा ट्रोलही व्हावं लागलं आहे. यापूर्वी एका टॉपलेस फोटोसाठी लोकांनी तिला बरंच सुनावलं होतं. पण अशा ट्रोल्समुळे नियाला काहीच फरक पडत नाही. निया आगामी ‘जमाई राजा 2.0’ या वेब सिरिजमध्ये तिचा को स्टार रवि दुबेसोबत दिसणार आहे. या सिरिजमध्ये दोघांनी बरेच बोल्ड सीन दिले आहेत. याबाबतही निया बिनधास्तपणे आधीच बोललेली आहे.

जान्हवी कपूरचा ड्रेस इतका महागडा, की त्या पैशात आपली मालदीवची ट्रिप होईल