निया शर्माने काढले टॉवेलवर फोटोः बघे झाले नाराज...

निया शर्माने काढले टॉवेलवर फोटोः बघे झाले नाराज… (Nia Sharma shares photos in towel, trolls call her ‘ghatiya’)

निया शर्मा ही टेलिव्हिजनवरील हॉटेस्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. एक हजारों में मेरी बहना है, खतरों के खिलाडी, नागिन-४ ते जमाई राजा अशा मालिका व कार्यक्रमात भूमिका करून तिनं चाहत्यांची प्रशंसा मिळवली आहे. आपली फॅशन स्टाईल आणि बोल्ड वर्तणुकीने ती नेहमीच चर्चेत राहिली आहे.

काळानुरूप ती आपली फॅशन बदलत राहिली. म्हणून तिला टी.व्ही. क्षेत्रातील फॅशनिस्टा असंही म्हटलं जातं. देशी असो वा परदेशी अथवा बिकीनी – हे कपडे घालून निया बोल्ड छब्या देऊन सोशल मीडियाचे वातावरण नेहमीच तापवते. कधी कधी तिचा हा बोल्ड अवतार ट्रोलर्सनी धुडकावून देखील लावला आहे. तरीपण तिनं आता असे बोल्ड फोटो शेअर केले आहेत की बघणाऱ्यांनी तिला खडे बोल सुनावले आहेत.

जवळपास दररोज आपले फोटो व व्हिडिओ शेअर करणाऱ्या नियाने हल्लीच फक्त टॉवेल लपेटून आपलं आणखी एक बोल्ड रूप दाखवलं आहे. त्यामध्ये अंगावर फक्त टॉवेल लपेटून तिनं फोटो काढून घेतले आहेत. ब्लू आय लायनर आणि न्यूड लिपस्टिक असा मेकअप करून ती चांगलीच सुंदर दिसते आहे.

हे फोटो शेअर करून ती म्हणते – मुझे अपनी आंखो में ड्रामा पसंद है.

नियाचा हा अवतार काही लोकांना खूप आवडला. पण त्याचबरोबर काही युजर्सनी आपली नाराजी व्यक्त करून भलेबुरे कमेंट्‌स दिले आहेत. काही लोकांनी तर तिची ‘घटिया’ म्हणत निर्भत्सना केली आहे. ट्रोलर्सनी तिची कशी चिरफाड केली आहे तेही पाहा ना-

आपल्या बोल्ड फोटोंवरून ट्रोल होण्याची नियाची ही पहिलीच वेळ नव्हे. या आधी पण तिची सोशल मीडियावर बघ्यांनी निंदा केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच नियाच्या टॉपलेस फोटोंची अशीच चर्चा घडली होती. त्यामध्ये तिनं फक्त लाईफ जॅकेट घालून फोटो काढले होते.

तर बघूया, नियाचे लेटेस्ट फोटोज्‌. ज्यांनी इंटरनेटवर अलिकडेच आग लावली आहे.

आणखी वाचा – गुड न्यूज तैमूर बिग बी झाला.. करीनाला मुलगा झाला