निया शर्माने पाठ उघडी टाकून केला डान्स : ट्रोलर...

निया शर्माने पाठ उघडी टाकून केला डान्स : ट्रोलर्स म्हणाले, जरा तरी लाज बाळग ग बाई… (Nia Sharma Sets Fire On Social Media By Sharing Her Bold Dance Video, Trollers Says ‘Sharam Karo…’)

नागिन फेम निया शर्माने सोशल मीडियावर आपला डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावरून इंटरनेटवर खळबळ माजली आहे. कारण काही चाहते दिवाने झाले आहेत, तर काही युजर्सनी तिला वाईट पद्धतीने ट्रोल केले आहे.

जवळपास रोजच निया आपले बोल्ड फोटो व व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करते. अन्‌ तेथील तापमान वाढवते. त्यानुसार पांढरा टॉप आणि पांढरी जिन्स्‌ घालून डान्स करतानाच व्हिडिओ शेअर केला आहे. पांढऱ्या टॉपमध्ये तिने पाठ उघडी टाकली आहे.
या व्हिडिओ सोबत नियाने लिहिले – ‘ये काला हो या सफेद! दोनों के बीच कोई नही है.’

या ड्रेसमध्ये निया फारच हॉट आणि ग्लॅमरस्‌ दिसते आहे. तिनं गळ्यात ख्रिश्चनांच्या क्रॉसचं लॉकेट घातलं आहे. केस मोकळे सोडल्याने ती भुताडी दिसते आहे. तर ऑरेंज कलरची भडक लिपस्टीक तिने लावली आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर फॅन्स व फॉलोअर्सचे कमेन्टस्‌ येऊ लागले.

निया शर्माची सहकलाकार अदा खानने कमेंट म्हणून आग प्रदर्शित करणारे इमोजी टाकले आहेत.

काही युजर्सना नियाचा बोल्ड अवतार आवडला तर काहींनी तिच्यावर खरमरीत टीका केली.

काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता. त्यामध्ये गोव्यातील समुद्रकिनारी ती पळताना दिसली होती.

तिच्या कामाबाबत म्हणाल तर ‘जमाई २.०’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये ती नायिकेच्या भूमिकेत आहे. या वेब सिरीज्‌मध्ये तिने काही इंटिमेट सीन दिले आहेत. ‘खतरों के खिलाडी’ या मालिकेची ती विजेता ठरली होती.

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा