निया शर्माने केल्या सायकलवरून भन्नाट कसरती (Nia...
निया शर्माने केल्या सायकलवरून भन्नाट कसरती (Nia Sharma Performs Awesome Exercises On Bicycle)

टी. व्ही. जगतातली लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सोशल मीडियावर नेहमीच नजरेत भरण्याजोगी प्रसिद्धी मिळवते. येताजाता आपले हॉट आणि बोल्ड फोटो टाकून ती चाहत्यांना वेड लावते. आत्ताही तिने आपला एक मजेदार व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यावरून तिची वाहवा होते आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
छानपैकी सायकल चालवत असल्याचा व्हिडिओ नियाने सोशल अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती सायकल चालवताना भन्नाट कसरती करताना दिसते आहे.

अशा तऱ्हेचे स्टंट्स मुली कमी प्रमाणात करतात. पण नियाने ते सफाईने करून दाखवले आहेत. दोन्ही हात सोडून निया सहजतेने सायकल चालवताना या व्हिडिओत दिसते. आपण निष्णात सायकलपटू असल्याचे तिने सिद्ध केले आहे. नियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
नियाच्या या व्हिडिओला चाहत्यांनी उचलून धरलं आहे. ती यामध्ये नेहमीसारखीच सुंदर आणि मोहक दिसते आहे. पिंक कलरचं जॅकेट आणि कॅप व ब्लॅक शॉर्टस् – व्हाईट शूज तिला शोभून दिसत आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
नियाने यापूर्वी देखील सायकलस्वारीचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये तिने अवधेश नामक ऑटोवाले भैय्याचे, छायाचित्रण केल्याबद्दल आभार मानले होते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
शनिवारची सकाळ आपल्यासाठी किती ताजेतवानी होती, असे वर्णन नियाने कालच्या सायकलस्वारीचे केले आहे.