बोल्ड आणि हॉट निया शर्मा कशी झाली करोडपती? तुम्...

बोल्ड आणि हॉट निया शर्मा कशी झाली करोडपती? तुम्ही थक्क व्हाल, इतके पैसे ती एका एपिसोडसाठी घेते (Nia Sharma Is Worth Crores : Charges So Much For One Episode)

Nia Sharma Is Worth Crores

टी.व्ही. क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री निया शर्मा सदैव काही ना काही कारणांनी गाजत असते. काल-परवाच तिचा वाढदिवस आणि तिच्या नवीन घराचा गृहप्रवेश गाजला. आता तिने बिग बॉस १५ या कार्यक्रमात प्रवेश केला आहे. पण या किंवा अन्य कार्यक्रमात काम करण्यासाठी ती किती पैसे घेते हे माहिताय्‌ का?

Nia Sharma Is Worth Crores

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

गेल्या कित्येक वर्षांपासून टी.व्ही. वर काम करून नियाने करोडोची संपत्ती कमावली आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोडसाठी ती मोठी रक्कम घेते.

Nia Sharma Is Worth Crores

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

निया शर्माने एकाहून एक सरस टी.व्ही. सिरीयल्स मधून कामे केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ती एका एपिसोडसाठी ८० हजार रुपये आकारते.

Nia Sharma Is Worth Crores

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या कार्यक्रमांशिवाय निया जाहिरातपट, म्युझिक व्हिडिओ व ब्रॅन्डस्‌ समर्थन याद्वारे लाखो रुपये कमावते. काही कार्यक्रमांसाठी तिने चक्क ६० लाख रुपये आकारले असल्याची बातमी आहे.

Nia Sharma Is Worth Crores

निया शर्माने नागीन ५ या मालिकेसह इश्क में मरजावा, जमाई राजा आदी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘दो घुंट मझे पिला दे’ हा तिचा व्हिडिओ अलिकडेच प्रसिद्ध झाला. तो खूप गाजला.