निया शर्माने एवढी धिटाई दाखविली की, एक युजर म्ह...

निया शर्माने एवढी धिटाई दाखविली की, एक युजर म्हणतो – ‘कपडे तरी कशाला घालतेस ग?’ (Nia Sharma Again Crossed The Limit Of Boldness, The User Said- Why Do You Wear Clothes)

टेलिव्हिजन वरील सर्वाधिक हॉटेस्ट अभिनेत्रींमध्ये वरच्या क्रमांकावरील अभिनेत्री निया शर्मा वरेचवर तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. निया तिची नवीन गाणी आणि अभिनयासोबतच आपल्या हॉट अवताराने लोकांना वेड लावत असते. काही नेटकरी तिच्या या बोल्ड अवताराचे चाहते आहेत तर काही तिला त्यासाठी दुषणंही देणारे आहेत. कधी कधी ती तोकडेही म्हणता येणार नाहीत इतके छोटे कपडे घालते अन्‌ ट्रोलर्सच्या तावडीत सापडते. आताही नियाने असाच एक टॉप घालून व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामुळे ट्रोलर्सनी तिची चांगलीच शिकवणी घेतली आहे.

Nia Sharma Again Crossed The Limit Of Boldness

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

Nia Sharma Again Crossed The Limit Of Boldness

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

निया शर्माने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक शॉर्ट व्हिडिओ, ज्याला जिस जिफ म्हणतात, तो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निया सुंदर दिसत असली तरी कपड्यांमुळे तिला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

नियाने या व्हिडिओत ब्लू कलरची हॉट पँट आणि व्हाइट कलरचा क्रॉप टॉप घातलेला आहे. आपल्या या ड्रेसला कम्प्लिट लूक देण्यासाठी तिने केसांचीही स्टाइल करत बन बनवला आहे. नियाने डोळ्यांना जो मेकअप केला आहे, त्यामुळे ती फारच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

Nia Sharma Again Crossed The Limit Of Boldness

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

Nia Sharma Again Crossed The Limit Of Boldness

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

नियाच्या फोटोंमधील अदांवर युजर्सपैकी एकाने लिहिलंय, ‘कपडे तरी कशाला घालतेस गं?’ तर दुसऱ्या युजरने, ‘यापेक्षा छोटे कपडे मिळाले नाही का?’ असा प्रश्न विचारला आहे. तसेच एका युजरने तर ‘कॅन आय हग यू’ असंच विचारून टाकलं आहे.

Nia Sharma Again Crossed The Limit Of Boldness

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

Nia Sharma Again Crossed The Limit Of Boldness

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

खरं तर नियाला युजर्सच्या कोणत्याही प्रतिक्रियांनी काहीच फरक पडत नाही. उलट ट्रोलर्सना कशाप्रकारे गप्प करायचं हे तिला चांगलंच माहीत झालं आहे. मागे एकदा आपल्या मुलाखतीमध्ये ट्रोलर्सना उत्तर देताना तिनं स्पष्टपणे सांगितलं होतं की, ‘लोकांचं कामच आहे बोलायचं, ते बोल लावणारच, पण मला ज्या पद्धतीचे कपडे घालायला आवडतात, मी तेच घालते.’