लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला सि...

लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला सिद्धार्थ मल्होत्रा, सर्वांसमोर पत्नी कियारा अडवाणीबाबत म्हटली ही गोष्ट (Newlywed Sidharth Malhotra Gushes Over Kiara As He Talks About His ‘Night Perfume’)

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. त्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा ​​लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसला. अलीकडेच सिद्धार्थ एका कार्यक्रमात सहभागी झाला होता, तिथे अभिनेत्याने कियारा अडवाणीला पहिल्यांदा ‘माझी बायको  म्हणून संबोधले…

अलीकडेच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुंबईत एका ब्रँड इव्हेंटमध्ये गेला होता. कार्यक्रमादरम्यान अभिनेत्याने कियारा अडवाणीला माझी बायको असे संबोधले. अभिनेत्याच्या तोंडून माझी बायको असे शब्द ऐकून चाहते खूप आनंदी झाले आहेत. अभिनेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिद्धार्थच्या एका फॅन क्लबने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेता व्हिडिओत आपल्या आवडत्या परफ्यूमबद्दल बोलत आहे. त्याचवेळी सिद्धार्थ म्हणतो की मी माझ्या कलेक्शनमध्ये एक नवीन परफ्यूम समाविष्ट केला आहे, आशा आहे की माझ्या बायकोला तो आवडेल.

सिद्धार्थ म्हणाला- माझ्याकडे दिवसाचा आणि रात्रीचाही परफ्यूम आहे. हा परफ्यूम माझ्या नाईट परफ्यूम कलेक्शनमध्ये भर घालेल. मला आशा आहे की माझ्या बायकोलाही तो आवडेल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सिड आणि कियाराचे चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कोणीतरी लिहिले- कियारा, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो, तर एकाने लिहिले की ते वाक्य लहान आहे पण त्याचा अर्थ खूप खोल आहे.