हनीमून साजरा करायला मालदीव बेटावर पायल रोहतगी प...

हनीमून साजरा करायला मालदीव बेटावर पायल रोहतगी पोहचली : तिथून पाठविले पोहण्याच्या पोशाखातील हॉट फोटो (Newly Married Payal Rohatgi Looks Stunning In Swimwear, Shares Pics From Honeymoon With Hubby Sangram Singh)

कंगना रणावतच्या ‘लॉकअप’ कार्यक्रमात भाग घेतलेली अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीगीर संग्राम सिंह याच वर्षी जुलै महिन्यात विवाहबद्ध झाले होते. मात्र हनीमून साजरा करण्यासाठी हे जोडपं तीन महिन्यांनी मालदीव बेटावर पोहचले आहेत. तिथून त्यांनी रोमॅन्टिक फोटो पाठविले आहेत.

हनीमूनसाठी गेलेल्या पायलने आपल्या इन्स्टाग्रामवर फारच छान छान फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती पोहण्याचा पोशाख घालून मस्ती करताना दिसत आहे.

पायलच्या या बिकिनीमधील उत्तान फोटोंवर, तिचा नवरा संग्राम सिंहने हार्टवाले इमोजी पोस्ट करून आपली पसंती व्यक्त केली आहे.

‘लॉकअप’ कार्यक्रमातून लोकांच्या नजरेत भरलेली पायल पोहण्याच्या तलावामध्ये डुंबत छान ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. सोबत तिने मजकूर लिहिला आहे – ‘प्रेम आणि प्रामाणिक इरादे घेऊन वाटचाल कराल तर तुमची नेहमीच जीत होईल.’

समुद्रकिनाऱ्यावरील आपल्या वावरण्याचे रील्स बनवून पायलने इन्स्टाग्राम वर शेअर केले आहेत ते तिच्या चाहत्यांना पसंत पडले आहेत.

पायल ही नियमित योगासने करते. हनीमूनला गेली आहे तरी ती आपल्या फिटनेस बाबत जागरूक आहे. समुद्रकिनारी ती योगासने करताना दिसत आहे.

नवऱ्यासोबत तिथे जाऊन सुखासीनतेमध्ये वेळ घालवला आणि केक पण कापला.