मनोरंजनाची मेजवानी देणारे न्यू इयरचे खास कार्यक...
मनोरंजनाची मेजवानी देणारे न्यू इयरचे खास कार्यक्रम (New Year Events Flooded With Entertainment And Comedy Skits)

By Deepak Khedekar in मनोरंजन
सरत्या वर्षाला हसरा निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करणारे धमाल कार्यक्रम स्टार प्रवाह वाहिनीने आयोजित केले आहेत.
‘धुमधडाका २०२२’ हा कार्यक्रम स्टार प्रवाह वर होणार असून त्यामध्ये श्रुती मराठे, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे यांचे डान्सेस असणार आहेत. शिवाय आनंद शिंदे यांची मस्त गाणी बघायला मिळतील. आनंद आणि अवधूत गुप्ते यांची अफलातून जुगलबंदी असेल. सिध्दार्थ जाधव आणि सिध्दार्थ चांदेकर या दोघांचे खुमासदार निवेदन, विनोदाची आतषबाजी करणार आहे.


