भिंती अशा सजवा (New Wall Décor Ideas)

भिंती अशा सजवा (New Wall Décor Ideas)

मोकळ्या भिंतींचा ट्रेंड कधीच मागे सरलाय. भिंतींवर केलेली थोडी कलाकुसरही आपल्या घराला नवा स्टायलिश लूक देऊ शकते. अर्थातच, त्यामुळे भिंती या केवळ छताला आधार देणार्‍या चार भिंती न राहता घरातील सजावटीचा आकर्षक केंद्र बनू शकतात.

खिडकीतील लहान लहान झुडपंही तुम्ही भिंतीवर सजवू शकता. हॉलमधल्या किंवा बाल्कनीतील एखाद्या संपूर्ण भिंतीवर अशा प्रकारे वॉल हँगिंग गार्डन तयार करता येईल. त्यासाठी लहान लहान झुडपांची लागवड केली, तर डोळ्यांना आणि मनालाही प्रसन्नता मिळेल. खरी झाडं अगदीच शक्य नसतील, तर आर्टिफिशिअल झाडांचा वापर करूनही ही सजावट करता येईल.

भटकंतीची आवड असेल, तर एखाद्या भिंतीवर नकाशा रेखाटायलाही हरकत नाही. यात आपण भेट दिलेल्या आणि भेट देण्यास उत्सुक असलेल्या ठिकाणांना हायलाइट करता येईल.

घरात लहान मुलं असतील, तर त्यांच्या कलाकुसरीला वाव देण्यासाठी तुम्ही एखादी भिंत राखून ठेवू शकता. अशा भिंतीला एखादा पेस्टल रंग देऊन सोबत रंगीत खडू किंवा वॉटर कलर ठेवा. मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे ही भिंत रेखाटू द्या. आणि घरात लहान मुलं नसलीच, तरी हा पर्याय इंटरेस्टिंग आहे. या भिंतीवर तुम्हाला एकमेकांसाठी संदेश लिहून ठेवता येतील.

भिंतीवर काहीतरी लावून सजावट करण्यापेक्षा, भिंतच सजवण्याचा पर्यायही उत्तम आहे. विशिष्ट भिंतीचं वेगळेपण जपण्यासाठी ब्राइट आणि बोल्ड रंगांचा वापर करा. अशा रंगाचा वापर करून भिंतीला वेगळा टेक्श्‍चर द्या. लहान खोल्यांमध्येही अशा स्पेशल भिंतीचा इफेक्ट छान येतो.

इतकी वर्षं केवळ पदार्थ वाढण्यासाठी म्हणून ज्या प्लेट्स आपण वापरत होतो, त्याही हल्ली भिंतीवर लटकलेल्या दिसतात. अर्थात, हल्ली वॉल हँगिंग प्लेट्सची सजावट अतिशय पसंत केली जाते. यासाठी लहान-मोठ्या आकर्षक कलाकुसर केलेल्या प्लेट्स वापरता येतील. याच प्रकारे तुम्ही भिंतीवर वेगवेगळ्या आकाराचे, प्रकाराचे बास्केट्सही लावू शकता.

लहान-लहान बर्‍याच फोटोफ्रेम्सचा गोतावळा नको असेल, तर आपल्या दिवाणखान्यात किंवा बेडरूममध्ये एकच मोठ्ठी… म्हणजे खरंच खूप मोठी… ओव्हर साइज्ड फोटोफ्रेम किंवा पेंटिंग लावा. ही एकच फ्रेम सार्‍यांचंच लक्ष वेधून घेईल. अगदी लहान खोलीलाही यामुळे वेगळाच लूक मिळेल. मग या फ्रेममध्ये काय असावं, एखादा फोटो किंवा चित्रं, यासाठी तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरू शकता.

घरातील एखाद्या किंवा सर्व भिंतींना झटपट वेगळा लूक द्यायचा असेल, तर वॉलपेपरच्या पर्यायाचा निश्‍चितच विचार करता येईल. विविध रंगातील प्लेन किंवा नानाविध डिझाइन्सचे वॉलपेपर बाजारात सहज उपलब्ध होतात. आपल्या बजेट आणि आवडीनुसार तुम्ही शेकडोंच्या पर्यायातून तुमचा युनिक वॉलपेपर निवडू शकता.

एकंदर, मोकळ्या भिंतींचा ट्रेंड कधीच मागे सरलाय. हल्ली घर सजवताना भिंती सजवण्यावर अधिक भर दिला जातो. त्यानुसार तुम्ही तुमच्या कल्पकतेने, तुमच्या आवडीनिवडी, बजेटनुसार भिंतींची कशीही सजावट करू शकता. भिंतींवर केलेली थोडी कलाकुसरही आपल्या घराला नवा स्टायलिश लूक देऊ शकते. अर्थातच, त्यामुळे भिंती या केवळ छताला आधार देणार्‍या चार भिंती न राहता घरातील सजावटीचा आकर्षक केंद्र बनू शकतात.

कोकणात गणेश चतुर्थीला घरात ज्या ठिकाणी गणपतीची स्थापना केली जाते, त्याच्या मागच्या भिंतीवर हमखास चित्र रेखाटलं जातं. हा प्रयोग तुम्ही तुमच्या शहरातल्या घरीही करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे दिवाणखान्यातील, बेडरूममधील किंवा मुलांच्या खोलीतील एखाद्या भिंतीवर एखादं चित्र काढून घेऊ शकता. मग हे निसर्गचित्र असावं की, व्यक्तिचित्रं की अ‍ॅबस्ट्रॅक्ट हा तुमचा चॉइस.असे सजवा स्वयंपाकघर (Kitchen Decor Ideas)