राखी सावंतच्या नव्या प्रेमात आधीच्या गर्लफ्रेन्...

राखी सावंतच्या नव्या प्रेमात आधीच्या गर्लफ्रेन्डने घेतली एन्ट्री; म्हणते, मी आदिलला ४ वर्षांपासून डेट करतेय्…(New Twist in Rakhi Sawant’s love story, BF’s ex-girlfriend calls And claims- They are dating for 4 years)

ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या नाटकी वागण्याने कायम चर्चेचा विषय ठरते आणि लोकांचे मनोरंजन करते. परंतु हल्ली एका खास गोष्टीमुळे ती चर्चेत आहे. पती रितेशला घटस्फोट दिल्यानंतर राखीच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एन्ट्री झाली आहे. सध्या ती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे. त्यांच्या या प्रेमप्रकरणामध्ये रोज नवीन नवीन ट्‌विस्ट येत आहेत. आधीच आदिलच्या कुटुंबातील लोकांना त्यांचे हे नातं पसंत नाहीये. आता असं कळतंय की राखी सावंतने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ऍंगेजमेन्ट केली आहे आणि आता तर तिच्या प्रेमप्रकरणात मोठाच ट्विस्ट आला आहे.

राखीच्या लव लाइफमध्ये तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीच्या आधीच्या गर्लफ्रेंडने प्रवेश केला आहे, ज्यामुळे खुद्द राखीलाही धक्का बसला आहे. राखीने स्वतः एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. राखी सावंतने सांगितले की, रोशिना देलावरी नावाच्या एका मुलीने तिला फोन करून सांगितले की, राखी ज्याला स्वतःचा ब्रॉयफ्रेंड समजत आहे, तो आदिल तिचा बॉयफ्रेंड आहे. एवढेच नव्हे तर गेल्या चार वर्षांपासून आम्ही एकमेकांना डेट करत असल्याचेही तिने राखीला सांगितले. रोशिनाने आदिल सोबत घालवलेल्या क्षणांची माहिती देत ते रिलेशनशिपमध्ये असल्याचेही सांगितले तसेच त्याच्यापासून दूर राहण्याची ताकीदही दिली आहे.

रोशिनाचा फोन येऊन गेल्यानंतर राखीने आदिलला याबद्दल विचारल्यानंतर त्याने रोशिना ही आपली गर्लफ्रेंड होती, मात्र आता माझे तिच्यासोबत काहीही संबंध नाहीत असे म्हटले आहे.

सगळ्यात मजेशीर गोष्ट अशी आहे की, राखीचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी मैसूरचा आहे आणि त्याची गर्लफ्रेंड रोशिनाही मैसूरचीच आहे. एवढेच नाही तर रोशिनाच्या इन्स्टाग्राम हँडलवर देखील आदिलसोबतचे तिचे फोटो आहेत, ज्यामुळे ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे सिद्ध होते.

काही दिवसांपूर्वीच राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून जगासमोर जाहीर केले होते की ती आता सिंगल नाही आहे. सगळ्यांसमोर खुल्लमखुल्ला तिने आपल्या नवीन बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीवर तिचे प्रेम असल्याचे सांगितले होते. एवढचे नाही तर तिने त्याच्यासोबत साखरपुडा केला असल्याचे सांगून अँगेजमेंट रिंगही दाखवली होती.