‘शुभविवाह’ दुपारी सुरू होणारी नवी मालिका; मालिक...

‘शुभविवाह’ दुपारी सुरू होणारी नवी मालिका; मालिकेत मधुरा देशपांडेचं ३ वर्षांनंतर पुनरागमन (New Serial ‘Shubh Vivah’ To Commence In The Afternoon Slot : Madhura Deshpande’s Come Back After 3 Years)

सर्वसाधारणपणे नव्या मालिकेची सुरुवात संध्याकाळी अथवा रात्रीच्या वेळी होते. (टाइम स्लॉट) पण स्टार प्रवाह वाहिनीने नव्या वर्षापासून नवा पायंडा पाडण्याचे ठरविले आहे. त्यांची ‘शुभविवाह’ ही नवी मालिका चक्क दुपारच्या वेळेत सुरू होत आहे. दुपारी २ वाजता ही मालिका १६ जानेवारीपासून प्रक्षेपित होणार आहे.

‘शुभविवाह’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री मधुरा देशपांडे हिचं मालिका क्षेत्रात ३ वर्षांनंतर पुनरागमन होत आहे. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमी या नायिकेची भूमिका ती साकारत आहे. भूमीच्या त्यागाची गोष्ट या मालिकेत मांडण्यात आली आहे.

आपल्या या भूमिकेविषयी मधुरा म्हणते, “भूमी हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. इतका पराकोटीचा त्याग करणारी व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारते आहे. कुटुंबावर भऱभरुन प्रेम करणारी भूमी कुटुंबाच्या सुखासाठी काहीही करु शकते, हे या मालिकेत दिसेल.”

‘शुभविवाह’च्या निमित्ताने एक छान कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी भावना मधुराने व्यक्त केली.’