उर्फी जावेदला मेकअपशिवाय बघून नेटकऱ्यांना बसला ...

उर्फी जावेदला मेकअपशिवाय बघून नेटकऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का (Netizens Are SHOCKED To See Urfi Javed Without Makeup As She Hides Her Face From Paparazzi, User Says, ‘Agyi Asliyat Samne’)

सतत चर्चेत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद मेकअपशिवाय असल्यामुळे कॅमेरापासून चेहरा लपवताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उर्फी सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.

उर्फी जावेदने आपला बिनधास्तपणा, बोल्ड लूक आणि धाडसीपणामुळे इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उर्फी रोज वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र कपडे घालून चाहत्यांसमोर उभी राहते. पण यावेळी उर्फी तिच्या विचित्र आउटफिट्स किंवा बोल्ड लूकमुळे नाही तर मेकअप नसल्यामुळे ट्रोल झाली.

नुकतीच उर्फी दवाखान्यात गेली होती. त्यावेळी ती नो मेकअप लूकमध्ये होती. आणि नेमके तेव्हाच पापाराझींनी उर्फीला मेकअपशिवाय कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. उर्फी कॅमेऱ्यापासून पळत होती.  ती वारंवार कॅमेरापासून चेहरा लपवत होती. पण पापाराझींनी उर्फीचा नो मेकअप लूक कॅमेऱ्यात कैद केलाच. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पापाराझी अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत अभिनेत्री पापाराझींपासून पळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी उर्फी जावेदला खूप ट्रोल केले आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी कॅमेऱ्यासमोर ‘बस अब हो गया’ म्हणताना दिसत आहे आणि कॅमेरापासून आपला चेहरा लपवत आहे. एका कॅमेरामनने तर अभिनेत्रीला विचारले की, तू का पळून जातेस, तुझ्या चेहऱ्याला काय झाले आहे का ?

यावर उर्फीने उत्तर दिले, “माझ्या चेहऱ्यावर एक चमक आहे, तुम्हाला आणखी काय दिसते” बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री पापाराझींसमोर मेकअपशिवाय जायला कचरत होती. त्यामुळे उर्फी कॅमेरासमोर आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत कॅमेरामनवर चिडचिड करत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले.

या व्हिडिओला एका युजरने कमेंट करत म्हटले की, मेकअपशिवायचा खरा चेहरा शेवटी समोर आलाच, तर आणखी एकाने म्हटले की, मेकअपशिवाय तू चेटकीण दिसतेस. व्हिडिओत उर्फीने कॅज्युअल आउटफिट आणि केसांची पोनीटेल बांधली होती.