बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या नेपोटिज्मवर सोनू सूदने व...
बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या नेपोटिज्मवर सोनू सूदने व्यक्त केले आपले मत, हे आधीही होते आणि पुढेही राहिल… (‘Nepotism Tha, Hai And Hamesha Rehega… How You Carve Your Path Amid Nepotism Debate, Proves Your Power’, Says Sonu Sood)

सोनू सूद हा चित्रपटासोबतच खऱ्या आयुष्यात देखील लोकांचा हिरो आहे. कोविडच्या काळात त्याने खूप उल्लेखनीय काम केले होते. विशेष म्हणजे त्याचे ते काम अजूनही चालू आहे. सोनू सध्या आपल्या आगामी ‘फतेह’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सोनूने साऊथ इंडस्ट्रीतही खूप काम केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनूने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर खुलेपणाने भाष्य केले.

सोनूने नेपोटिझमबद्दल म्हटले की- ते नेहमीच असेल. ज्यांचे पालक इंडस्ट्रीत आहेत, त्यांच्या मुलांना नक्कीच भूमिका मिळतील. त्या लढाईतून तुम्ही कसे बाहेर पडता हे तुमचे सामर्थ्य आहे.

सोनू पुढे म्हणाला- मला वाटतं इंडस्ट्री लोकांना भूमिका देते, पण हो कधी-कधी तुम्हाला स्वत:ला सिद्ध करायला किंवा तुमची जागा बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो. इंडस्ट्रीतल्या मुलांना भूमिका मिळतात, पण आपल्याला का मिळत नाहीत असे प्रत्येक आउटसाइडरला वाटते. पण हे नेहमीच होतं आणि नेहमीच राहिल.

नेपोटीझ्मवर आपले मत मांडण्याची ही कोणत्याही अभिनेत्याची पहिलीच वेळ नाही. सोनू या संपूर्ण प्रकरणावर खूप मोकळेपणाने बोलला. सोनूने साऊथ इंडस्ट्रीबद्दलही सांगितले की, त्याने हिंदी आणि साऊथमध्ये कधीही भेदभाव पाहिला नाही. त्याला साऊथमध्ये जास्त प्रेम मिळाले. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांसाठी त्याने हिंदी चित्रपटांच्या ऑफर धुडकावून लावल्या आहेत.