नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; ७२ प्रवाशांसह विमान क...

नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; ७२ प्रवाशांसह विमान कोसळलं; सर्व प्रवाशांचा मृत्यू (Nepal Plane Crashed Live Video 72 Death Rmm)

काल नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. या दुर्घटनेने सर्वच हादरून गेले. एटीआर-७२ हे प्रवासी विमान ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने काल सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.

अशात आता या धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. (Latest Plane Crashed Video) विमानात प्रवास करणाऱ्या कोणालाही आपला जीव जाणार आहे याची काहीच कल्पना नव्हती. त्यातील एक तरुण मस्त फेसबूक लाईव्ह करत होता. त्याच्या फेसबूक लाईव्हचाच हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात तरुण सुरूवातीला विमानातून बाहेरील दृश्य दाखवत आहे. पुढच्याच क्षणी अचानक त्याच्या हातातील फोन खाली पडतो आणि माणसांचा आरडाओरडा ऐकू येत आहे. तसेच नंतर विमानाला लागलेली आग दिसत आहे.

अभिषेक कुशवाह (२५), सोनू जैस्वाल (३५), विशाल शर्मा (२२), संजय जैस्वाल (३५) आणि अनिल कुमार राजभर (२७) असं मृत पावलेल्या पाच भारतीय नागरिकांची नावं आहेत, याबाबतची माहिती विमानतळ प्रशासनाने आली. संबंधित सर्वजण उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि गाझीपूर येथील रहिवासी होते. या पाचपैकी चार भारतीय शुक्रवारीच भारतातून काठमांडूला पोहोचले होते. रविवारी त्यांचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे.

या विमानात एकूण ११ परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुलं होती. यामध्ये ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश नागरिक, दोन कोरियन, एक अर्जेंटिनाचा आणि एक फ्रेंच नागरिक होता,” अशी माहितीही विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.