तारक मेहताच्या अंजली भाभीला अजूनही मिळाला नाही ...

तारक मेहताच्या अंजली भाभीला अजूनही मिळाला नाही तिच्या कामाचा मोबदला (Neha Mehta aka Anjali Bhabhi Reveals She Is Yet To Receive Her Dues)

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेची लोकप्रियता कायम असली तरी त्या मालिकेतील अंतर्गत वाद अनेकदा व्हायरल होत असतात. गेली 14 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने दोन वर्षांपूर्वी ही मालिका सोडली होती. पण मिळालेल्या माहितीनुसार नेहाला अजूनही तिचे पेमेंट मिळालेला नाही. मालिकेच्या निर्मात्यांनी तिला 6 महिन्यांचा पगार दिलेला नाही. तरीही प्रॉडक्शन हाउस लवकरच पैसे देतील असा तिचा विश्वास आहे.

नेहा मालिका सोडत असल्याचे समजल्यावर या मालिकेच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी दर्शवली होती. नेहाने 2020 मध्ये ही मालिका सोडली. तेव्हापासून ती छोट्या पडद्यापासून दूरच आहे.

नेहाने नुकतेच तिच्या गुजराती चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले की ‘तारक मेहताच्या प्रॉडक्शन हाउसकडून अजूनही तिला तिचे संपूर्ण पेमेंट मिळालेले नाही. तिचा सहा महिन्याचा पगार अजून द्यायचा बाकी आहे. मालिका सोडल्यावर तिने कित्येकदा मालिकेच्या निर्मात्यांना पेमेंटसाठी फोन केला होता पण त्यांच्याकडून तिला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण तरी तिला लवकरच तिच्या मेहनतीचा मोबदला मिळेल असा विश्वास आहे.’