काही पैशांसाठी रात्री जागरणात गाणारी नेहा कक्कड...

काही पैशांसाठी रात्री जागरणात गाणारी नेहा कक्कड आज आहे 38 करोडोंची मालकीण ( Neha Kakkar Used To Get Less Money In Jagran : Now She Owns Property Worth 38 Crores)

संपूर्ण देशाला जिच्या आवाजाची भुरळ पडली आहे अशी गायिका नेहा कक्कड आज 34 वर्षांची झाली. नेहाचा जन्म 6 जून 1988 ला ऋषिकेश मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. पुढे नेहा 2 वर्षांची झाल्यावर नेहाचे कुटुंब दिल्लीला शिफ्ट झाले. तिच्या कुटुंबाची परिस्थिती फारच हलाखीची असल्यामुळे नेहाने वयाच्या चौथ्या वर्षीच स्टेजवर गायला सुरुवात केली होती. घरखर्च भागवण्यासाठी तिच्या घरचे लोक रात्रीच्या जागरणात, भजनात स्टेज शो करायचे. त्यावेळी त्यांना एका जागरणासाठी 500 रुपये मिळायचे.

 त्यानंतर 2004 मध्ये नेहा तिचा छोटा भाऊ टोनी कक्कडसोबत मुंबईत आली. तिथे तिने बऱ्याच गायन स्पर्धांच्या ऑडिशन दिल्या. सरतेशेवटी इंडियन आइडलच्या दुसऱ्या सीजनसाठी तिची निवड झाली. टॉप 12 पर्यंत नेहा पोहचली पण तो सीजन ती जिॆंकू शकली नाही. फायनल पर्यंतही न पोहचताच ती एलिमिनेट झाली. पण आज ती त्याच शो ची परीक्षक म्हणून काम करत आहे.

मीराबाई नॉट आउट’ (2008) मध्ये सुखविंदर सिंहसोबत गाणे गाऊन तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे तिला ए.आर. रेहमानसोबत काम करण्याची संधी मिळाली. पण नेहाला खरी ओळख मिळाली ती 2009 मध्ये कलर्स वाहिनीवर आलेल्या  ‘ना आना इस देश मेरी लाडो’ च्या टायटल ट्रॅकमुळे. त्यावेळी ते गाणे खूप हिट ठरले. पुढे तिने अभिनयात नशीब आजमावले पण त्यात तिला फारसे यश मिळाले नाही.

2012 मध्ये नेहाला कॉकटेल चित्रपटात ‘सेकेंड हॅण्ड जवानी’ गाणे गाण्याची संधी मिळाली. या गाण्यामुळे तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. पुढे नेहाने ‘जादू की झप्पी’, ‘धतिंग नाच’, ‘मनाली ट्रांस’,’ लंडन ठुमकदा’ सारखी अनेक हिट गाणी दिली. त्यानंतर नेहाने मागे वळून पाहिलेच नाही.

सध्या नेहा 38 करोड रुपयांची मालकीण आहे. ती एका गाण्यासाठी 8 ते 10 लाख रुपये मानधन घेते. तर स्टेज शोसाठी 25 ते 30 लाख रुपये चार्ज करते. नेहा कक्कड सध्या इंडस्ट्रीमधली सगळ्यांत प्रसिद्ध आणि महागड्या गायिकांपैकी एक आहे.

ऋषिकेशमध्ये असताना एका छोट्याशा खोलीत राहणारी नेहा आज एका आलिशान अशा करोडोच्या घराची मालकीण आहे. सध्या ती मुंबईत राहत आहे. तर 2020 मध्ये तिने ऋषिकेश येथे एक आलिशान बंगला देखील खरेदी केला आहे.