नेहा कक्करच्या बाथरूम मधील फोटोंवर चाहते झाले फ...

नेहा कक्करच्या बाथरूम मधील फोटोंवर चाहते झाले फिदा (Neha Kakkar Shares Her Latest Photos From The Bathroom, Fans Loved Singer’s Bold Avatar)

आपल्या सुरेल आवाजाने मदहोश करणारी गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. या मंचावर तिचे बरेच चाहते आहेत. त्यामुळे ती आपले नवनवे फोटो त्यावर टाकते, ते बघता बघता इंटरनेटवर व्हायरल होतात. या खेपेला नेहाने आपले बाथरूममध्ये काढलेले नवे फोटो शेअर केले आहेत. त्यातील तिचा बोल्ड अवतार बघून चाहते तिच्यावर पुन्हा एकवार फिदा झाले आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बाथरूममध्ये काढलेले आपले बिनधास्त फोटो नेहाने इन्स्टाग्राम हॅन्डलवरून प्रसिद्ध केले. ते पाहून चाहते तिची खूपच तारीफ करत आहेत. तिचा नवरा रोहनप्रीत हा देखील त्यातला एक ठरला नि त्याने ”गुड मॉर्निंग! शॉवर हो गया… चल, दिवसाची सुरूवात करूया सकारात्मक… एक चहा घेऊन…” अशी कमेंट दिली. अर्थात्‌ हे फोटो नेहाने एका तारांकित हॉटेलातील बाथरूममध्ये काढलेले आहेत.

या फोटोंमध्ये नेहा बाथटबाच्या आत नसून त्याच्या काठावर बसलेली आहे. आणि तिने पांढऱ्या रंगाचा बाथरोब घातला आहे. लाइक्स आणि कमेंटस्‌ देऊन चाहते नेहावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘इंडियन आयडॉल १२’ या गाण्याच्या कार्यक्रमाची परीक्षक म्हणून नेहा काम करत होती. पण तिने या कामातून ब्रेक घेतला असून आपल्या जागेवर गायिका बहीण सोनू कक्करला  या कार्यक्रमाची परीक्षक म्हणून काम दिले आहे.

आपलं सुहास्य आणि सुरेल आवाजाने लोकांना मोहित करणारी नेहा कक्कर आणि तिचा नवरा रोहनप्रीत यांचे ‘खड तैनू में दस्सा’ हे रोमॅन्टिक गाणे अलिकडेच प्रकाशित झाले व लोकप्रिय झाले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या दोघांनी गेल्या ऑक्टोबरात लग्न केलं. त्यांचं लग्न धूमधडाक्यात लागलं. अन्‌ त्यातील प्रत्येक समारंभाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. लग्नानंतर नेहा व रोहनप्रीत आपले विविध फोटो इंटरनेटवर टाकतात. ज्याबद्दल लोकांना उत्सुकता असते.