आयफेल टॉवर समोर नेहा कक्कड – रोहनप्रीत सि...

आयफेल टॉवर समोर नेहा कक्कड – रोहनप्रीत सिंगची खुलेआम चुंबाचुंबी : पॅरिस येथील प्रेमकूजनाची छायाचित्रे (Neha Kakkar And Rohanpreet Singh Lip Lock Openly In Paris : See Viral Pics)

आपला नवरा रोहनप्रीत सिंग याच्या बरोबर नेहा कक्कड पॅरिसमध्ये सुटटीवर गेली आहे. तिथे आयफेल टॉवर समोर हे प्रणयी युगुल अतिशय रोमॅन्टिक  झालं. इतकं की त्यांनी खुलेआम तिथे एकमेकांची चुंबने  घेतली. परदेशामध्ये अशा प्रणयचेष्टा सार्वजनिक ठिकाणी सर्वसंमत असल्या तरी आपल्या पचनी पडत नाहीत.

लालभडक डेस घातलेली नेहा या फोटोंमध्ये रोहनशी चुंबाचुंबी करताना दिसत आहे. त्यासोबत तिने प्रेमाने ओथंबलेल्या ओळी लिहिल्या आहेत.

चाहत्यांनी या फोटोंवर कमेंटस दिल्या आहेत. काहींनी त्यांना लव्हबर्डस म्हटले आहे. तर काहीजण म्हणतात, ‘सावधान, बजरंग दलवाले पकडतील….’
अलीकडेच नेहाच्या गर्भारपणाच्या बातम्या उठल्या होत्या. अन आता हे जोडपे प्रेमाच्या शहरात प्रणय करीत पुन्हा चर्चेत आलं आहे.

लालभडक ड्रेसमध्ये नेहा खूपच सुंदर दिसते आहे, तर रोहनप्रीतला पांढरा सूट शोभतो आहे.

सर्व फोटो : इन्स्टाग्रामच्या सौजन्याने.