आपल्या बाळाला अंगावर पाजत असतानाचे फोटो नेहा धु...

आपल्या बाळाला अंगावर पाजत असतानाचे फोटो नेहा धुपियाने टाकले; लोकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी (Neha Dhupia Get Trolled For Shared Photo Of Breastfeeding To Her Son)

दुसऱ्यांदा आई बनलेल्या नेहा धूपियाने सोशल मीडियावर तिचा लेटेस्ट आणि बोल्ड फोटो शेअर केला आहे. आपल्या मुलाला स्तनपान करतानाचा हा फोटो टाकून नेहाने सामान्य महिलेपासून उच्चभ्रू महिलेपर्यंत सगळ्यांनाच, ‘स्तनपान हा महिलेचा अधिकार आहे आणि त्यात लाज बाळगण्याची काहीच गरज नाही.’ असा संदेश दिला आहे. परंतु नेटकऱ्यांनी मात्र या फोटोबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेत्री नेहा धूपिया आणि अंगद बेदी या जोडप्यास ३ ऑक्टोबरला दुसरा मुलगा झाला. ही गोड बातमी उभयतांनी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअरही केली होती. सध्या नेहा आपलं मातृत्त्व एन्जॉय करत आहे.

नेहा नेहमीच “फ्रीडम टू ब्रेस्टफीड” या विषयावर सार्वजनिकरित्या तिचे मत मांडताना दिसते. आताही दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर आपल्या न्यूबॉर्न बेबी बॉयसोबतचा एक बोल्ड फोटो तिने शेअर केला आहे. या फोटोत तिने आपल्या बाळाचा चेहरा हाताने झाकला आहे. या फोटोसोबत तिने एक संदेश आणि ‘फ्रीडम टू फीड’ असा हॅशटॅग लिहून हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

हा फोटो शेअर करून नेहा समाजामध्ये स्तनपानाचं महत्त्व सांगू इच्छीते. या आधी २०१९ मधे आंतरराष्ट्रीय स्तनपान आठवड्या दरम्यान तिने फ्रीडम टू फीड चा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच पहिली मुलगी मेहरच्या जन्मानंतरही तिने मातृत्त्व आणि स्तनपानाचं महत्त्व सांगितलं होतं. तिच्या या कार्यात पती अंगद बेदीनेही तिला सहकार्य केले. एवढेच नव्हे तर चाहते आणि सेलिब्रिटींनी देखील तिची प्रशंसा केली होती.

नेहाने तिचा स्तनपान करतानाचा फोटो शेअर करताच काहीच वेळात फोटो व्हायरल झाला असून अनेक बॉलिवूड सेलेब्ससह नेटकऱ्यांनीही तिच्या या पोस्टची प्रशंसा केली आहे, तर काही नेटकऱ्यांनी यावर तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.

एका यूजरने लिहिलंय की, ‘हे सर्व दाखवण्याची काय गरज आहे?’ तर दुसरा युजर लिहितोय, ‘काही राहिलं असेल तर तेही पोस्ट कर. लाज नावाची काही गोष्ट आहे की नाही? तर काहींनी म्हटलंय की, स्तनपान करण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं आहे? काहींनी नेहाला नाटकी म्हटले आहे. स्तनपानाचा दिखावा करण्याची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.