आपल्या वाढदिवशी हॉट कपडे घालून टेबलावर डान्स कर...

आपल्या वाढदिवशी हॉट कपडे घालून टेबलावर डान्स करणाऱ्या नेहा भसीनवर युजर्सनी घेतले तोंडसुख (Neha Bhasin Birthday Bash: Singer Dances On Table, Gets Brutally Trolled)

सुप्रसिद्ध गायिका नेहा भसीनचा आज 40 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने तिने काल रात्री वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. यावेळी नेहाने अतिशय बोल्ड असा व्हाइट बॉडी सूट स्टाइलचा आउटफिट परिधान केला होता. या कपड्यांना बिकिनी गाऊन सुद्धा म्हणतात. तिने ब्रालेट ब्लाउजसह शीयर थाय हाय स्लिट फिटेड स्कर्ट घातला होता.

नेहाने पापाराझींसमोरही खूप पोज दिल्या. तसेच त्यांच्या विनंतीला मान देऊन एक गाणे देखील गायले. पण या सगळ्यामध्ये नेहाला तिच्या आउटफिटमुळे चांगलेच ट्रोल करण्यात आले.

युजर्स म्हणाले की सध्या अंतर्वस्त्र हे मुख्य पोशाख बनले आहेत. एका युजरने लिहिले की – आम्ही ते दिवस मिस करत आहोत जेव्हा ऐश्वर्या, प्रीती, राणी, करिश्मा, रवीना यांसारख्या अभिनेत्री साड्या, सलवार सूट किंवा गाऊनमध्ये पाहायला मिळायच्या.

आजकाल भयंकर फॅशन सेन्सने त्यांची जागा घेतली आहे. सध्या वयाची पर्वा न करता भरपूर अंगप्रदर्शन करणे, बिकिनीसारखे गाऊन घालणे ही फॅशन झाली आहे. उर्फीसारखे लोक लाईम लाईटसाठी असे प्रकार करतात पण हे घृणास्पद आहे.

दुसऱ्या युजरने लिहिले की, आजकाल अंगप्रदर्शन म्हणजे आधुनिकता बनली आहे. एखाद्या मर्यादेपर्यंत अंगप्रदर्शन करणे ठीक आहे पण त्यात थोडी शालीनता असावी.

नेहाच्या वाढदिवसाच्या पार्टीला तिचे बिग बॉसचे मित्र आणि अनेक कलाकार उपस्थित होते. रश्मी देसाईने ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस घातला होता. याशिवाय हिमेश रेशमिया, उमर रियाझ, निशांत भट्ट, राजीव अडातिया, राकेश बापट यांनीही नेहाच्या पार्टीला उपस्थिती लावली होती.

राकेशने आपल्या इन्स्टा स्टोरीवर नेहाच्या डान्सचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये नेहा टेबलवर उभी राहून डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इतर अनेक माध्यमांनीही पोस्ट केला होता, पण नंतर तो डिलीट करण्यात आला.

पण तोपर्यंत लोकांनी तो पाहिला होता आणि यासाठी नेहाला प्रचंड ट्रोल करण्यात आले. व्हिडिओ पाहून लोक म्हणू लागले की बार डान्सर्स पोटापाण्यासाठी, घर चालवण्यासाठी हे करतात पण तरीही पोलीस बार डान्सर्सना पकडतात. पण यांचे काय ? यांच्या असभ्यतेला मर्यादाच नाही.