संपूर्ण कुटुंबासह अभिनेत्री नीतू कपूर यांनी साज...

संपूर्ण कुटुंबासह अभिनेत्री नीतू कपूर यांनी साजरा केला आपला ६३वा जन्मदिवस (Neetu Kapoor turns 63, Alia Bhatt Joins Ranbir Kapoor, Kareena Kapoor And Others For Birthday Celebration)

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री नीतू कपूर यांनी काल रात्री उशिरा संपूर्ण कुटुंबासह त्यांचा ६३ वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रणधीर कपूरपासून करीना आणि करिश्मा कपूर अन्‌ आलिया भट्टही हजर होती. चला तर मग पाहूया नीतू कपूर यांच्या वाढदिवसाचे काही फोटो…

८ जुलै १९५८ साली दिल्लीमध्ये नीतू यांचा जन्म झाला. आज त्यांनी वयाची ६३ वर्षं पूर्ण केली आहेत. बुधवारी रात्री आपल्या कुटुंबातील सदस्य तसेच फ्रेंड्‌ससोबत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे. त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रणबीर कपूर, करीना कपूर, करिश्मा कपूर, समीरा कपूर, बबीता, रणधीर कपूर, रिद्धिमा कपूर साहनी, भरत साहनी, समायरा साहनी, अरमान जैन आणि अनीसा मल्होत्रा असे सगळेच एकत्र जमले होते.

नीतू कपूर यांची होणारी सून अर्थात रणबीर कपूरची गर्लफ्रेंड आलिया भट्ट देखील तिची आई  सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टसोबत बर्थडे पार्टीसाठी आली होती.

करिश्मा कपूरने इन्स्टाग्रामवर आंटी नीतू कपूरचा केक कापतानाचा फोटो शेअर केला आहे. करिश्माने या फोटोवर “हॅप्पी बर्थडे डियरेस्ट नीतू आंटी!” असे लिहून नीतूजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नीतू कपूर यांची लेक रिद्धिमा कपूरने देखील मॉम नीतू कपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनचे इनसाइड फोटोज्‌ सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

करीना कपूर खानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो प्रदर्शित केला आहे, ज्यात करिश्मा कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी तिच्यासोबत दिसत आहेत. या फोटोला करीनाने “सिस्टर्स🥰❤.” अशी कॅप्शन दिली आहे.

रिद्धिमा साहनीने रणबीर आणि आई नीतूसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. सोबत अशी कॅप्शन लिहिलीय, ” मी आणि माझं! हॅप्पीएस्ट बर्थडे मम्मी! आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे ♥️.”

करिश्मा कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी यांच्या मुली समायरा आणि समीरा यांच्यात कमालीचं बॉन्डिंग आहे.

नीतू कपूर इन्स्टाग्राम खूपच सक्रीय असतात. बरेचदा त्या आपल्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर करून त्यावर लिहिलं होतं – ‘माझं जग’