ऋषी कपूरच्या ७० व्या वाढदिवशी नीतू कपूरने प्रदर...

ऋषी कपूरच्या ७० व्या वाढदिवशी नीतू कपूरने प्रदर्शित केला, कधीही न पाहिलेला फोटो: आलिया भट्टच्या आईने दिली प्रतिक्रिया (Neetu Kapoor shares an unseen Pic of late Rishi Kapoor on his 70th birth anniversary, Alia Bhatt’s Mom reacts)

बॉलिवूडचा लाडका अभिनेता, दिवंगत ऋषी कपूरचा आज वाढदिवस आहे. तो हयात असता तर ७० वा वाढदिवस साजरा केला असता. या निमित्ताने नीतू कपूरने दोघांचा कधीही न पाहिलेला फोटो प्रसिद्ध केला आहे.

नीतूने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ऋषी कपूरला शुभेच्छा देणारे स्क्रीनशॉट दिले आहेत. सोबतच दोघांचा जुना फोटो आहे. या फोटोवर ऋषीचे चाहते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कमेंट्स करत आहेत. या फोटोत ऋषीने भलामोठा गुलाबी रंगाचा चष्मा घातला आहे. तो खूप आनंदी दिसतो आहे. हा फोटो प्रसिद्ध करून  नीतूने आपल्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 नीतूच्या या फोटोवर तिच्या विहीणबाईने (आलिया भट्टची आई) म्हणजे सोनी राझदानने हार्ट इमोजी पोस्ट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा न पाहिलेला फोटो पाहून नेटकऱ्यांनी आपल्या भावूक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

गेल्या वर्षी देखील नीतूने ऋषी कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन असाच एक फोटो प्रसिद्ध केला होता. तसेच ऋषी कपूरच्या कॅन्सर उपचारा दरम्यानचे काही क्षण जागवले होते.

ऋषी कपूर ला कॅन्सर झाला होता त्यावर बराच काळ उपचार चालू होते अखेरीस 30 एप्रिल 2020 रोजी त्याची प्राणज्योत मालवली होती.