‘चोली के पीछे…’ गाण्याच्या वेळी सुभाष घई यांनी ...

‘चोली के पीछे…’ गाण्याच्या वेळी सुभाष घई यांनी ब्राची साइज वाढवण्यास सांगितल्याने नीना गुप्ता यांना वाटली होती लाज (Neena Gupta Recalls Wearing Heavily Padded Bra For ‘Choli Ke Peeche Kya Hai’ After Subhash Ghai Shouted- Kuchh Bharo)

बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील ‘खलनायक’ हा चित्रपटाच्या वेळी बरेच वाद झाले होते. या चित्रपटाशी संबंधित एका गोष्टीचा नीना गुप्ताने आता खुलासा केला आहे. सध्या नीना गुप्ता त्यांच्या जीवनावर आधारित ‘सच कहूं तो’ या पुस्तकामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या या पुस्तकातून अनेक रहस्ये बाहेर पडत आहेत.

‘खलनायक’ चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याच्या चित्रीकरणावेळी काय घडले होते हे नीना गुप्ता यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यांनी या गाण्यासाठीच्या पेहरावासंबंधी नीनाला असं काही करायला सांगितलं की ज्याच्यामुळे त्यांना लाज वाटली होती.

‘जेव्हा पहिल्यांदाच मी गाणे ऐकले तेव्हा मला ते हिट ठरणार असे जाणावले होते. नंतर सुभाष घई यांनी या गाण्यात माझी भूमिका काय आहे हे सांगितले. त्यानंतर ते गाणं करण्यासाठीचा माझा हुरुप संपला होता. पण हे गाणे ईला अरुण गात आहे हे ऐकून मला आनंद झाला. तिच्यासोबत मी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते’ असे नीना म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, ‘या गाण्यासाठी मला गुजराती पोशाख करायचा होता. नंतर तो पोशाख घालून मला दिग्दर्शक सुभाष घई यांना दाखवायला जायचे होते. मला पाहून सुभाष घई नाही… नाही.. काही तरी भरा… म्हणाले. ते ऐकून मला लाजीरवाणं वाटलं. यामध्ये खासगी काहीच नव्हतं. मी कसं दिसावं याबाबतची कल्पना त्यांच्या डोक्यात स्पष्ट होती. सुभाष घई यांना त्यांच्या कामाबाबत कोणतीही तडजोड नको होती. आणि म्हणूनच ते उत्तम दिग्दर्शक आहेत.’

दुसऱ्याच दिवशी मला हेवी पॅडवाली ब्रा दिली गेली. त्यानंतर त्यांचा लूक पाहून सुभाष घई यांनी योग्य असल्याचं सांगितलं, असं नीना यांनी सांगितलं.

हकीकत अशी आहे की, हे गाणं जितकं हिट ठरलं तितकेच त्याबाबत वादही झाले, लोकांनी हे गाणं अश्लील आहे असं सांगून त्याच्या कॅसेट्‌सही जाळल्या होत्या.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / सोशल मीडिया