गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनेच सुशांत सिंह राजपूत...

गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनेच सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरविले होते – एनसीबीचा आरोप (NCB Says- Rhea Chakraborty Bought Drugs, Handed Them To Sushant Rajput)

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणामध्ये रिया चक्रवतीच्या समस्या काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आता या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीने दावा केला आहे की सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रियाने अनेकदा त्याला ड्रग्ज खरेदी करुन दिले आहे. अन्‌ ड्रग्ज खरेदी केल्यानंतर त्याचे पेमेंटही केले गेले आहे. काल या प्रकरणातली सुनावणी पार पडली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एनसीबीनं आरोपपत्राचा मसुदा सादर केला असून त्यात रिया चक्रवर्तीचं देखील नाव समाविष्ट आहे. या मसुद्यामध्ये सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, सुशांतच्या घरी काम करणारे दोन कर्मचारी आणि इतर अशा एकूण ३५ आरोपींची नावं या मसुद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या आरोपींनी मिळून सुशांतला ड्रग्ज पुरवलं आणि त्याला ड्रग्जचं व्यसन लावण्यात हातभार लावला, असा दावा या मसुद्यात करण्यात आला आहे.

मृत्यूच्या २ वर्ष आधीपासूनच सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज मिळत होते, असा दावा या मसुद्यामध्ये करण्यात आला आहे.

एनसीबीने दावा केला आहे की रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शौविक आणि सगळ्या आरोपींनी एकमेकांसोबत मार्च २०२० पासून डिसेंबर २०२० पर्यंत कारस्थान रचलं होतं, जेणेकरुन ते बॉलिवूड आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये ड्रग्सचं वाटप आणि खरेदी विक्री करू शकतील. आरोपींनी मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीला वित्तपुरवठा केला, तसंच गांजा, चरस, कोकेनसारख्या अंमली पदार्थांचा वापरही केला. यासाठी सर्व आरोपींच्या विरोधात कलम २७ आणि २७ ए, २८ आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. NDPS अंतर्गत प्रकरणाची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश व्ही जी रघुवंशी यांनी या प्रकरणातल्या सुनावणीसाठी आता २७ जुलै ही ताऱीख दिली आहे.