चौकशीसाठी उशिरा आलेल्या अनन्या पांडेला ‘हे तुझं...

चौकशीसाठी उशिरा आलेल्या अनन्या पांडेला ‘हे तुझं प्रॉडक्शन हाउस नाही …’ अशा शब्दात समीर वानखेडे यांनी खडे बोल सुनावले (‘NCB Is Not A Production House But Office Of Central Agency’ Sameer Wankhede Reprimands Ananya Panday For Arriving Late)

मुंबई-गोवा क्रूझवरील अमली पदार्थांच्या पार्टीप्रकरणी एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या जवळपास १९ दिवसांपासून तुरुंगात आहे तर दुसरीकडे एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनन्या पांडेची ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली.

ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून अभिनेत्री अनन्या पांडे हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (NCB) समन्स बजावलं होतं. गुरुवारी तिची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला शुक्रवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बोलावण्यात आलं होतं. मात्र, ती तीन तास उशिरानं म्हणजे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. त्यामुळं समीर वानखेडे संतापले.

‘हे तुझं प्रॉडक्शन हाउस नाही. केंद्रीय तपास संस्थेचं कार्यालय आहे. यापुढं चौकशीला बोलावल्यास वेळेवर हजर राहावं लागेल,’ असं वानखेडे यांनी अनन्या पांडेला बजावल्याचं सूत्रांकडून समजतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात अनन्या आरोपी नाही, केवळ साक्ष नोंदवण्यासाठी तिला बोलावण्यात आलं होतं. अनन्याचा मोबाइल व लॅपटॉप एनसीबीनं जप्त केल्याचंही समजतं.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम