सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ३० हजार पानांचे आरो...

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ३० हजार पानांचे आरोपपत्र दाखल (NCB Filed a Charge Sheet Of 30 Thousand Pages)

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

नऊ महिन्याच्या कालावधीनंतर सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. त्याच्या मृत्यु प्रकरणात अंमली पदार्थांची वाहतूक व वापर झाला असावा, या संशयावरून सखोल तपास करून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आरोपपत्र दाखल करण्याचे ठरविले आहे. सदर विभागाचे मुंबई क्षेत्र प्रमुख समीर वानखेडे हे प्रकरण स्पेशल एनडीपीसी न्यायालयात दाखल करणार आहेत. हे आरोपपत्र सुमारे २५ हजार पानांपेक्षा अधिक असण्याचे वृत्त मिळाले आहे. या प्रकरणात सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक हे प्रमुख आरोपी आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – पीटीआय

गेल्या वर्षी जून महिन्यात सुशांत सिंह मृतावस्थेत आढळल्यानंतर त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याच्या कारणावरून बऱ्याच उलटसुलट चर्चा होऊन त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर न्याय मिळवून देण्याचा धोशा लावला होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणी अंमली पदार्थांचा सहभाग आढळल्यावरून विविध साक्षी पुराव्यांच्या आधारे सदर आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. एनसीबीने आतापावेतो ३३ लोकांना अटक केली आहे. त्यामध्ये रिया, तिचा भाऊ तसेच सुशांतच्या घरातील कर्मचारी व काही अंमली पदार्थ पुरवठादार यांचा समावेश आहे. तरीपण त्याच्या मृत्युबाबत कोणताही निष्कर्ष अद्याप काढता आलेला नाहीये. त्यामुळे सुशांतचे चाहते व त्याचे कुटुंबिय त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर सतत धोशा लावत आहेत.