नवाजुद्दीन सिद्दीकीने खऱ्या ट्रान्स महिलांसोबत ...

नवाजुद्दीन सिद्दीकीने खऱ्या ट्रान्स महिलांसोबत केले होते काम, अभिनेत्याने सांगितला अनुभव (Nawazuddin Siddiqui Worked With Real Trans Women, Told How Was The Experience)

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. सध्या तो आपल्या आगामी ‘हड्डी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. जेव्हा पहिल्यांदा या चित्रपटाची घोषणा झाली होती, तेव्हा नवाजुद्दीनची या चित्रपटात कोणती भूमिका असेल याची चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र जेव्हा या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आता पुन्हा नवाजने एक नवा फोटो शेअर केला आहे.

‘हड्डी’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाशी संबंधित फोटो शेअर केले आहेत, त्या फोटोंमध्ये तो ट्रान्सजेंडर लूकमध्ये दिसत आहे. एका फोटोत तो एकटा दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत तो आणखी काही ट्रान्सजेंडरमध्ये उभा असलेला पाहायला मिळतो.

हा फोटो शेअर करताना अभिनेत्याने लिहिले की, “सेटवर ट्रान्सजेंडर समुदायासोबत काम करण्यापासून ते हड्डीच्या शूटिंगपर्यंतचा अनुभव नवाजुद्दीन सिद्दीकीसाठी खूप छान होता.”

अभिनेत्याने हा फोटो शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. प्रत्येकजण त्याच्या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. हा फोटो शेअर करताना अभिनेत्याने खऱ्या आयुष्यातील ट्रान्सजेंडरसोबत काम करण्याचा आपला अनुभवही शेअर केला.

चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगताना नवाजुद्दीन म्हणाला, “हड्डीमध्ये वास्तविक जीवनातील ट्रान्स महिलांसोबत काम करणे हा एक अविश्वसनीय अनुभव आहे. तो एक प्रकारचा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. या समुदायाबद्दल अधिक जाणून घ्या. त्यांची उपस्थिती सशक्त होती.”

आता नवाजचे हे वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. बऱ्याच दिवसांनी तो या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. ‘हड्डी’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे, नवाजचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम