25 कोटी दिले तरी छोटी भूमिका साकारणार नाही, नवा...

25 कोटी दिले तरी छोटी भूमिका साकारणार नाही, नवाजुद्दीन सिद्दीकेचे स्पष्टीकरण( Nawazuddin Siddiqui Says I Will Not Do A Small Roll Anymore )

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. त्याच्या अभिनयाच्या चाहत्यांची संख्या अगणित आहे. सुरुवातीच्या काळात नवाजला त्याला मिळणाऱ्या भूमिकांप्रमाणे वागावे लागायचे पण आता काळ बदलला असून नवाज एक सुपरस्टार बनला आहे. आता त्याला हव्या तशा भूमिका तयार होतात.

लवकरच नवाज लक्ष्मण लोपेज आणि रॉबर्टो जिरॉल्ट दिग्दर्शित हॉलिवूड चित्रपटात काम करणार आहे. जोपर्यंत मुख्य भूमिका असलेला विदेशी चित्रपट ऑफर होत नाही तोपर्यंत त्या चित्रपटात काम करायचे नाही अशी आपण शपथ घेतल्याचा खुलासा नवाजने नुकताच केला आहे.

एका मुलाखतीत नवाजने सांगितले की, या इंडस्ट्रीत मी माझ्या करीअरमध्ये अनेक चित्रपटांत काम केले आहे. मी छोट्या भूमिकाही केल्या आहेत.आता कोणी मला 25 कोटी दिले तरी मी छोटी भूमिका करणार नाही. पैसा आणि प्रसिद्धी हा आपल्या कामाचा भाग आहे असे मला वाटते.तुम्ही तुमचे काम चोख केले तर पैसा आणि प्रसिद्धी तुमच्या मागे येईल.

जर तुम्ही त्यांचा पाठलाग केलात तर तुम्हाला ते कधीच सापडणार नाहीत, म्हणून फक्त चांगले काम करत राहा. आपण कधी कधी पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे आयुष्यभर धावतो आणि काहीही मिळत नाही. माझा विश्वास आहे की स्वत:ला असे बनवा की पैसा आणि प्रसिद्धी तुमचे गुलाम बनून तुमच्या मागे धावत येतील.

नवाजने गेल्या दशकात अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत पण जेव्हा त्याला विचारण्यात आले की सर्वात आव्हानात्मक भूमिका कोणती आहे? तर त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, ‘हे खरोखर तुमच्यावर अवलंबून आहे.

तुम्ही कोणत्या प्रकारच्या भूमिका निवडता आणि त्या कुठे घेत आहात. प्रत्येक भूमिका अतिशय खास बनवण्याची क्षमता अभिनेत्यामध्ये असते. आणि तेच पात्र दुस-या अभिनेत्याकडून वाईट पद्धतीने वठवता येते. त्यामुळे सर्व काही अभिनेत्यावर अवलंबून आहे असे मला वाटते. मी साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा खास करण्याचा माझा प्रयत्न असतो.