नवाजुद्दीन सिद्दीकीची खरी जीवन कहाणी एखाद्या चि...

नवाजुद्दीन सिद्दीकीची खरी जीवन कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही (Nawazuddin Siddiqui Real Life Story is Not Less Than a Film Story, This is How He Got Recognition in Bollywood)

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्यांनी आपल्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान मिळवले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा असाच एक अभिनेता आहे, ज्याने कठोर परिश्रमाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. आजच्या युगात तरुण मुलं फिल्मी दुनियेत प्रवेश मिळविण्यासाठी आपली बॉडी, स्टाईल आणि ग्लॅमरची विशेष काळजी घेतात. परंतु नवाजुद्दीन सिद्दिकीकडे पाहिले असता खात्री पटते की, तुमच्याकडे पॅशन आणि टॅलेंट असेल तर तुम्ही नक्की यश मिळवू शकता. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या खरी जीवनकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. चला तर नवाजला बॉलिवूडमध्ये खरी ओळख कशी मिळाली ते जाणून घेऊया.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

सुमारे १९ वर्षांपूर्वी नवाजुद्दीनने आमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटात काही सेकंदांची भूमिका साकारून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले, तेव्हा त्याच्याकडे क्वचितच कोणाचे लक्ष गेले असेल, परंतु त्याने इंडस्ट्रीत स्वत:ला उभे करण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि एक वेगळी ओळख निर्माण केली. आज प्रत्येकजण त्याला ओळखतो आणि त्याच्या अभिनयाची प्रशंसा करतो.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरजवळील एका छोट्याशा गावात राहिलेल्या नवाजची खरी जीवनकहाणी पूर्णपणे फिल्मी वाटावी अशीच आहे. अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी १९९७ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्याने अभिनयाचे धडे घेतले. परंतु त्याला चित्रपटांमध्ये विशेष भूमिका मिळत नव्हत्या. मात्र, सुरुवातीच्या काळात कितीही छोटी भूमिका मिळाली, तरी ती चांगली वठवायची आणि आपल्या टॅलेंटच्या जोरावर एक दिवस इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवायचा, असा विचार तो करत राहिला.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

‘सरफरोश’ चित्रपटात छोटासा रोल करून बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर नवाजुद्दीनने ‘शूल’मध्ये एका वेटरची भूमिका केली. त्यानंतरही अनेक चित्रपटांमध्ये त्याला छोट्या-छोट्या भूमिका मिळाल्या, पण ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील फैजलच्या भूमिकेने त्याच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला. फैजलच्या व्यक्तीरेखेमुळे नवाज लोकांच्या नजरेत आलेला असला तरी याआधी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘आजा नचले’, ‘एक चालिस की लास्ट लोकल’, ‘ब्लॅक फ्रेंड’, ‘फिराक’, ‘देव डी’, ‘पिपली लाइव्ह’, ‘कहानी’ आणि ‘पान सिंग तोमर’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये तो दिसला होता.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

‘गँग्स ऑफ वासेपूर’ हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आणि त्याने आपल्या दमदार अभिनयाने आपण खरोखर मोठे कलाकार आहोत हे सिद्ध केले. या चित्रपटानंतर त्याने एकापाठोपाठ एक अनेक हिट चित्रपट दिले. या चित्रपटांमध्ये ‘किक’, ‘मांझी द माउंटन मॅन’, ‘द लंच बॉक्स’, ‘रमन राघव २’, ‘रईस’ आणि ‘ठाकरे’ इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय ‘सेक्रेड गेम्स’ नावाच्या वेब सीरिजमध्येही तो दिसला आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

आज नवाजुद्दीन सिद्दीकीकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच कंगना राणौतच्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘हिरोपंती २’मध्ये तो नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.