बॉलीवूड बाबत नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 3 मोठ्या त...

बॉलीवूड बाबत नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 3 मोठ्या तक्रारी (Nawazuddin Siddiqui Has 3 Big Complaints About Bollywood)

नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये चांगलाच स्थिरावला आहे. तरीपण त्याला या चित्रसृष्टी बाबत 3 मोठ्या तक्रारी आहेत. कदाचित इतर कलाकारांना पण असतील. पण नवाजुद्दीनने बिनधास्तपणे सांगितल्या आहेत. एका मुलाखतीत त्याने या तक्रारींचा पाढा वाचला होता. आणि त्यावर अंमल करण्याची इच्छा प्रकट केली होती.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम 
बॉलीवूड या नावाबद्दलच त्याची पहिली तक्रार आहे. तो म्हणतो, हे नाव बदलून फिल्म इंडस्ट्री असं ठेवलं पाहिजे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम 
त्याची दुसरी तक्रार चित्रपटाचे जे स्क्रिप्ट असते, त्याच्या भाषेबद्दल आहे. तो म्हणतो, “आमच्या हाती स्क्रीप्ट रोममध्ये (इंग्रजी) येते. ते पाठ करणे अवघड असते म्हणून मी देवनागरीत स्क्रीप्ट मागतो.”

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम 
तिसऱ्या तक्रारीबाबत नवाज म्हणतो, “चित्रपट हिंदी असतात. पण चित्रण प्रसंगी दिग्दर्शक आपापसात इंग्लिश मध्ये बोलतात. ते प्रत्येक कलाकाराला समजतेच असे नाही. साऊथ चित्रसृष्टीतले लेखक, दिग्दर्शक, मेकप मॅन; आपल्या कन्नड, तमिळ, तेलगू भाषेचा अभिमान बाळगतात. तिकडे सगळ्यांना भाषा समजते. आपल्याकडे दिग्दर्शक काही वेगळं बोलतो त्याचे असिस्टंट काही वेगळे बोलतात. कलाकार मात्र एकाकी पडतो. जो कलाकार नाटकातून आला असतो, त्याला इंग्लिश येत नसेल तर इथे काय चाललंय ते त्याला कळत नाही.”

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
या नवाजुद्दिनच्या 3 ठळक तक्रारी असून त्या लवकरात लवकर बदलण्याचा तो प्रयत्न करतोय. तो आता ‘टिकू वेड्स शेरू, या चित्रपटात दिसेल. त्याची भूमिका असलेला ‘हिरोपंती 2’ नुकताच प्रदर्शित झाला आहे.­­

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम