नवाजुद्दीन सिद्दीकेने बांधला वडिलांच्या नावे बं...

नवाजुद्दीन सिद्दीकेने बांधला वडिलांच्या नावे बंगला : कंगनाने केली तारीफ (Nawazuddin Siddiqui Builds Dream Bungalow : Kangana Ranaut Congratulates Him)

आपल्या अभिनय कौशल्याने व साध्या राहणीने नावारूपास आलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकेने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता त्याने बांधलेल्या नव्या बंगल्यामुळे तो चर्चेत आला आहे. या आलिशान नव्या बंगल्यास त्याने वडिलांचे नाव दिले आहे.

हा बंगला त्याने मुंबईतच बांधला आहे. त्याचे सौंदर्य आणि भव्यतेची चर्चा होते आहे. त्याच्या वडिलांचे नाव नवाबुद्धीन आहे. ‘नवाब’ हे त्यांचे नाव त्याने बंगल्यास दिले आहे.

या बंगल्याचे फोटो इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा आलिशान बंगला बांधायला तीन वर्षे लागली आहेत. या घराची अंतर्गत सजावट त्याने स्वतः केली असून आपल्या पुरातन, पारंपरिक घरास डोळ्यासमोर ठेवून त्याने ही सजावट केली आहे.

नवाजुद्दीनच्या या वाटचालीबद्दल कंगना रणावतने त्याचे अभिनंदन केले आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नवाजुद्दीनच्या बंगल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये बंगल्यासमोर एका खुर्चीत बसून नवाज वाचन करतो आहे. कंगनाप्रमाणेच बॉलिवूडचे काही कलाकार आणि चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत.

कंगना आणि नवाजुद्दीन ‘टिकू वेडस्‌ शेरू’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. त्याची निर्मिती स्वतः कंगनाने केली आहे.