कमी वयातच नाव्या नवेली बनली बिझनेस वुमन, करोडों...

कमी वयातच नाव्या नवेली बनली बिझनेस वुमन, करोडोंच्या मालकिण आहे अमिताभ बच्चन यांची नात (Navya Naveli Became a Business Woman at a Young Age, Amitabh Bachchan’s Granddaughter is the Mistress of Crores)

कमी वयातच नाव्या नवेली बनली बिझनेस वुमन, करोडोंच्या मालकिण आहे अमिताभ बच्चन यांची नात (Navya Naveli Became a Business Woman at a Young Age, Amitabh Bachchan’s Granddaughter is the Mistress of Crores)

महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा भलेही अभिनय क्षेत्रापासून खूप दूर आहे. पण ती सतत कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत तिने करीअरसाठी व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला. अमिताभ यांची नात कित्येक कोटींची मालकिण आहे.

नव्या नवेलीही आरा हेल्थची सह-संस्थापक आहे. हा भारतातील पहिला महिला आरोग्य आणि वेलनेस प्लॅटफॉर्म आहे. नव्या एक व्यावसायिक महिला असण्यासोबतच प्रोजेक्ट नवेलीची संचालिका सुद्धा आहे. यामध्ये महिलांना त्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य लक्षात घेऊन संधी आणि संसाधने उपलब्ध करून दिली जातात.

याशिवाय नव्या स्वतःचा पॉडकास्ट शो देखील चालवते, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या सेलिब्रिटींना आमंत्रित करते.  नव्याने आपल्या करीअरची सुरुवात एका अॅड एजन्सीमध्ये इंटर्नशिपद्वारे केली.

नव्या इंडस्ट्रीतील दिग्गज घराण्यातील मुलगी आहे. तिचे आजोबा अमिताभ बच्चन, आजी जया बच्चन, मामा अभिषेक बच्चन आणि मामी ऐश्वर्या राय बच्चन हे ग्लॅमर इंडस्ट्रीतील दिग्गज स्टार आहेत, असे असूनही नव्याला बॉलिवूडमध्ये रस नाही. तिला कधीच अभिनेत्री व्हायचे नाही.