नवरात्रीत राशीनुसार करा देवीची पूजा (Navratri S...

नवरात्रीत राशीनुसार करा देवीची पूजा (Navratri Special: Durga Puja According To Zodiac Sign)

Durga Puja According To Zodiac Sign

नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे. दुर्गा मातेची प्रत्येक रुपं तिच्या वेगवेगळ्या शक्तींसाठी ओळखली जातात. नवरात्रोत्सवात दुर्गा मातेला नऊ दिवसांमध्ये वेगवेगळी फूलं आणि नैवेद्य अर्पण केले जातात. जे दुर्गामातेला खूपच प्रिय आणि शुभ असतात.

आज नवरात्रौत्सवाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी आई ‘ब्रम्हचरणी’ची पूजा केली जाते. ब्रम्हचरणीचा अर्थ होतो तपाचे आचरण करणारी. आई ब्रम्हचारणीच्या पूजेसाठी नारंगी आणि हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. या दिवशी आईला हिरव्या रंगाची पानं आणि हिरव्या रंगाचे हार अर्पण करावे. तसंच आईला साखरेचा नैवेद्य ठेवावा. त्यामुळे ती लवकर प्रसन्न होते.

नवरात्रीमध्ये राशीनुसार कोणत्या देवीची पूजा करावी?

Durga Puja According To Zodiac Sign

१) मेष : स्कंदमातेची पूजा करा अन्‌ दुर्गा चालीसाचे पठण करा.

२) वृषभ : महागौरीच्या स्वरूपाची पूजा करा, ललिता सहस्त्रनामाचे पठण करा.

३) मिथुन : ब्रह्मचारिणीची पूजा करा, दुर्गा द्वादशचे पठण करा.

४) कर्क: शैलपुत्रीची पूजा करा, लक्ष्मी सहस्त्रनामाचे पठण करा.

५) सिंह : कुष्मांडा देवीची पूजा करा, दुर्गा मंत्राचा जप करा.

६) कन्या : ब्रह्मचारिणीची पूजा करा, लक्ष्मी मंत्राचा जप करा.

७) तुळ : महागौरीची पूजा करा, काली चालीसा वाचा.

८) वृश्चिक : स्कंदमातेचे ध्यान करा, दुर्गा सप्तशती वाचा.

९) धनु : चंद्रघंटाची पूजा करा, दुर्गा कवच पठण करा.

१०) मकर : मा कालीची पूजा करा, ओम ऐम्‌ ह्रीम क्लेन चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करा.

११) कुंभ : मां कालरात्रीची पूजा करा, सिद्ध कुंजिका स्तोत्राचा जप करा.

१२) मीन : चंद्रघंटाची पूजा करा, हळदीच्या माळेने बागलामुखी मंत्राचा जप करा.