नाना पाटेकर यांचे तब्बल 5 वर्षांनंतर मोठ्या पडद...

नाना पाटेकर यांचे तब्बल 5 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन(Nana Patekar Returns To The Big Screen After Almost 5 Years)

बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर गेली 5 वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर होते. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर मी टू प्रकरणाचे आरोप लावण्यात आल्यामुळे ते चर्चेत असायचे. पण त्यांचा अभिनय अनेक वर्षे पाहायला न मिळाल्यामुळे चाहते नाराज झाले होते. आता नानांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

नाना पाटेकर लवकरच मोठ्या पडद्यावर परतणार आहेत. द कश्मीरी फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी द वॅक्सीन वॉर या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर या चित्रपटात कोणते कलाकार पाहायला मिळणार याबाबत जोरदार चर्चा चालू होती. आता ती नावे समोर आली आहेत.

अभिनेता अनुपम खैर हे द वॅक्सीन वॉर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात नानासुद्धा काम करणार असल्याचे सांगितले होते.

नाना सर्वात शेवटी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या काला या चित्रपटात दिसले होते. तसेच द वॅक्सिन वॉर हा चित्रपट या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.