नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्या प्रेमाची ...

नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्या प्रेमाची गोष्ट : मनीषा कोईरालाने या अभिनेत्रीसोबत नाना पाटेकरला रंगेहाथ पकडले (Nana Patekar And Manisha Koirala Love Story: When Manisha Koirala Caught Nana Patekar In An Intimate Position With Another Actress)

एक वेळ अशी होती की, ज्यावेळेस नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांचं प्रेमप्रकरण सगळीकडे चर्चिलं जात होतं. दोघंही एकमेकांवर जिवापाड प्रेम करत होते. परंतु, एके दिवशी मनिषानं नाना पाटेकरला या अभिनेत्रीसोबत एका रुममध्ये रंगेहाथ पकडलं आणि त्यांच्यातील नात्याला तडा (नव्हे भगदाडच पडलं) गेला. कोण होती ती अभिनेत्री?

असं तुटलं नाना आणि मनिषामधील नातं
नाना पाटेकर नेहमीच नाना विवादांमध्ये घेरलेले असतात. प्रेमाच्या मामल्यातही अनेकदा ते संकटात सापडले आहेत. मनीषा कोईरालासोबतचं त्यांचं प्रेमप्रकरणही असंच वादानं संपुष्टात आलं. नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांनी खामोशी द म्युजिकल, अग्निसाक्षी, युगपुरुष यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. नाना पाटेकरांचं आपल्यापेक्षा २१ वर्षांनी लहान असलेल्या मनीषावर प्रेम जडलं. नानांचं नशीब थोर म्हणून की काय एकत्र काम करताना मनीषाही त्यांच्या प्रेमात पडली. दोघांचं प्रेमप्रकरण सगळ्यांना माहीत झालं. असं म्हणतात की, नेमकं त्याच वेळेस नानांचं त्यांची बायको नीलाकांती यांच्यासोबत काहीतरी बिनसलं होतं आणि त्या नानांना सोडून एकट्याच राहत होत्या. ‘खामोशी द म्यूजिकल’ या चित्रपटाच्या दरम्यान मनीषाची नानांशी ओळख झाली. पहिल्याच भेटीत नाना मनीषाच्या प्रेमात पडले. खरं तर या चित्रपटात नाना हे मनीषाच्या वडिलांची भूमिका करत होते. हळूहळू त्यांच्यात मैत्री वाढली आणि मनीषाही नानांवर प्रेम करू लागली. नाना पाटेकर तर मनीषाबाबत इतके पझेसिव्ह होते की चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी मनीषाने छोटे कपडे घातले की नाना तिला स्टेजवरच ओरडायला सुरुवात करायचे. मनीषा कोईराला त्यांच्यातील नात्याला नाव देऊ इच्छित होती. तिला नानांशी लग्न करायचं होतं, परंतु नाना, बायको आणि मनीषा अशा दोन्ही दगडांवर पाय ठेवून होते, म्हणजे त्यांना आपली बायको नीलाकांति यांना घटस्फोट द्यायचा नव्हता. नानांच्या अशा वागण्याने मनीषा दुखावली गेली होती.

मनीषाने नानांना एका अभिनेत्रीसोबत रंगेहाथ पकडले
अभिनेत्री आयेशा झुल्कामुळे नाना आणि मनीषा यांच्यातील प्रेमसंबंध तुटले असे म्हटले जाते. एके दिवशी मनीषाने स्वतः आयेशा झुल्का आणि नाना यांना एका खोलीत एकमेकांसोबत पाहिले. त्या दोघांना एकत्र पाहून चिडलेल्या मनीषाने नानासोबत भांडण केले, एवढंच नाही तर भांडण पुढे मारामारीपर्यंत पोहोचले. नंतर नानांनी खूप प्रयत्नांनी मनीषाची समजूत घालून तिला शांत केले. या घटनेनंतर मनीषा कोईराला नानांना मोकळं सोडू इच्छित नव्हती. नानांनी त्यांच्या पत्नीस घटस्फोट देऊन लवकरात लवकर आपल्याशी लग्न करावे यासाठी ती नानांवर दबाव टाकू लागली. परंतु नानांना आपल्या बायकोला घटस्फोट द्यायचा नसल्यामुळे परिस्थिती बिकट होत गेली. आणि मनीषा स्वतःहून नानांपासून कायमची दूर झाली.

नाना पाटेकर आणि आयेशा झुल्का यांचं नातं असं तुटलं…
२००३ सालामध्ये नाना पाटेकर आणि आयेशा झुल्का यांनी ‘आंच’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं. तेव्हा आयेशा झुल्का ही नानांपेक्षा २४ वर्षांनी लहान होती. या चित्रपटामध्ये दोघांनी अतिशय बोल्ड सीन दिले आहेत. हे सीन करत असतानाच नाना पाटेकर आणि आयेशा झुल्का एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. या दोहोंमधील नातं इतकं पुढे गेलं होतं की विवाहित असूनही नाना आयेशा झुल्का सोबत लिव्ह इन मध्ये राहू लागले होते. त्या वेळेस नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्यातील जवळीकतेची चर्चा होत होतीच. अचानक आयेशा झुल्कासोबतच्या प्रेमप्रकरणाच्या बातमीने सगळे हैराण झाले. त्यातच मनीषाने नाना व आयेशा यांना एकत्र पाहिल्यानंतर मनीषा आणि नानामध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला. त्यानंतर नानांनी आयेशा झुल्कासोबत आपलं असलेलं नातं मीडियासमोर जाहिरपणे सांगितलं. दोघं एकत्र राहू लागले. अनेक वर्षं त्यांचं नातं राहिलं. नंतर एकदा नाटकाच्या वेळी हे नातंही संपलं. त्यावेळी स्टेजवर सगळ्यांसमोरच नानांनी आयेशा झुल्का यांना बदनाम केलं शिवाय तिच्यावर हातही उचलला. आयेशा आपला अशा प्रकारे केला गेलेला अपमान सहन करू शकली नाही आणि ती नाना पाटेकर यांच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.

अभिनेत्री तनुश्री दत्ता नेही नाना पाटेकरांवर विनयभंगाचा केला आरोप
अलीकडेच अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. हा वाद इतका वाढला की त्याच दरम्यान बॉलिवूडपासून सामान्य जनतेपर्यत सगळेच ‘मी टू’ या मोहिमेत उतरले आणि अनेक महिलांनी आपल्या सोबत झालेल्या अत्याचारांबाबत खुलासा केला. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपामुळे त्यांच्या समस्यांत अधिकच भर पडली. या आरोपांमुळे ‘हाऊसफूल ४’ हा सिनेमाही नानांच्या हातून गेला.

नाना पाटेकरांचं नाव कितीही वादातीत असलं तरी त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटसृष्टीमध्ये त्यांची वेगळी अशी ओळख आहेच. नाना पाटेकर यांनी बॉलिवूडला अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. ते केवळ अभिनेते नसून लेखक आणि चित्रपट निर्मातेही आहेत. त्यांना अनेक फिल्मफेअर ॲवॉर्ड्‌स आणि राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर नाना पाटेकर यांना पद्मश्री सारख्या सन्माननीय पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे.