‘रंग माझा वेगळा’...

‘रंग माझा वेगळा’ मध्ये दीपा-कार्तिकच्या जुळ्या मुलींचं बारसं होणार मंदिरात; त्यांची नावं काय असतील?(Naming Ceremony Of Twin Girls To Be Performed In Temple; Story Takes A Turn In ‘Rang Maza Vegala’)

Naming Ceremony, Rang Maza Vegala

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दीपा आणि कार्तिकच्या जुळ्या मुलींचा नामकरण सोहळा पाहायला मिळणार आहे. दीपाने जुळ्या मुलींना जन्म दिला असला तरी दोन्ही मुली दोन वेगवेगळ्या घरात वाढत आहेत. कार्तिकने मुलींचं पितृत्व नाकारल्यामुळे दीपाने एकटीने मुलीला वाढवण्याचा निर्धार केला आहे. तर दीपाची खूण म्हणून सौंदर्याने दीपाची एक मुलगी आपल्या घरी वाढवण्याचं ठरवलं आहे. दोन्ही मुली जरी वेगवेगळ्या घरात वाढत असल्या तरी योगायोगाने दोघींचं बारसं मात्र एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी होणार आहे.

Naming Ceremony, Rang Maza Vegala
Naming Ceremony, Rang Maza Vegala
Naming Ceremony, Rang Maza Vegala

देवावर श्रद्धा असलेली दीपा आपल्या लेकीचं बारसं मंदिरात करायचं ठरवते. तर दुसरीकडे सौंदर्या इनामदारही कोणताही बडेजाव न करता मंदिरातच बारसं करण्याचा निर्णय घेते. दोन्ही मुलींचं नावही ठरवण्यात आलं आहे. दीपा आणि कार्तिकच्या नावावरुनच दीपिका आणि कार्तिकी अशी नावं ठरवण्यात आली आहेत. आता या दोन लेकी दुरावलेल्या दीपा-कार्तिकला पुन्हा एकत्र आणणार का हे पाहाणं उत्सुकतेचं असेल.

Naming Ceremony, Rang Maza Vegala