शाहरुख खानच्या बंगल्यावर लावलेली, २५ लाख रुपये ...

शाहरुख खानच्या बंगल्यावर लावलेली, २५ लाख रुपये किंमतीची ‘मन्नत’ ही नेमप्लेट गायब (Name plate Worth Rs 25 Lakh On ‘Pathan’ Star Shahrukh Khan’s House ‘Mannat’ Missing)

बॉलिवूडचा बादशहा म्हटला जाणाऱ्या शाहरूख खानचा बंगला ‘मन्नत’ हा त्याच्या इतकाच चर्चेत असतो. त्याच्या बंगल्याबाहेर नेहमी चाहत्यांची गर्दी दिसून येते. मात्र आता याच बंगल्यावर लावलेली, ‘मन्नत’ ही अक्षरे असलेली नेमप्लेट गायब झाली असल्याचं आढळून आलं आहे.

ही नेमप्लेट फारच किंमती आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख आणि गौरी खानने ती बदलली होती. व आता तीच दिसेनाशी झाल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगते आहे.

‘मन्नत’च्या बाहेर डकवलेली ही चमचमणारी नेमप्लेट २५ लाख रुपये किंमतीची आहे, असं बोललं जात आहे. एरव्ही बाहेर ताटकळणाऱ्या चाहत्यांना शाहरूख खान अधून मधून, बंगल्याच्या बाल्कनीतून दर्शन देत असतो. तोही अलिकडे दिसेनासा झाला आहे.

२५ लाखांची ही पाटी शाहरूखच्या सांगण्यावरून हटवण्यात आली आहे की, ती चोरीला गेली आहे, हे कळायला मार्ग नाही.

एका चाहत्याने सोशल मीडियावर असा अंदाज व्यक्त केला आहे की, या पाटीवरून काहीतरी नवा प्रयोग चालला असावा. तर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘मन्नत’ची दुरुस्ती चालली आहे. म्हणून ही नेमप्लेट तात्पुरती काढण्यात आली असावी.