अभिनेत्री कृतिका कामराचे नाव या अभिनेत्यांसोबत ...

अभिनेत्री कृतिका कामराचे नाव या अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते (Name of TV Actress Kritika Kamra has been Associated with These Actors, She Was in Limelight Due to Her Affairs)

‘कितनी मोहब्बत है’ या टीव्ही मालिकेमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री कृतिका कामरा या मालिकेमुळेच घरोघरी प्रसिद्ध झाली. त्यावेळी तरुणाईकडून या मालिकेला खूप पसंती मिळाली. मालिकेत करण कुंद्रा कृतिकासोबत दिसला होता. या मालिकेनंतर कृतिकाला मोठ्या शोजच्या ऑफर्स येऊ लागल्या.

टीव्हीवर नाव आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर कृतिका ‘मित्रों’ या बॉलिवूड चित्रपटातही दिसली, पण तिची जादू मोठ्या पडद्यावर फारशी चालू शकली नाही, त्यामुळे ती पुन्हा छोट्या पडद्यावर परतली. व्यावसायिक आयुष्यासोबतच कृतिका आपल्या अफेअर्समुळे सुद्धा चर्चेत होती. उत्तर प्रदेशातील बरेली येथे जन्मलेली कृतिका अनेक अभिनेत्यांना डेट केल्यामुळे चर्चेत आली होती.

करण कुंद्रा

कृतिका कामरा आणि करण कुंद्रा यांनी ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेत एकत्र काम केले होते. यादरम्यान दोघांची मैत्री झाली आणि या नात्याचे रुपांतर प्रेमात झाले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. कृतिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, एकेकाळी आम्‍ही दोघंही आमच्या कामात इतके व्‍यस्‍त झालो की आम्‍ही आमच्या नात्याला सांभाळू शकलो नाही त्यामुळे अचानक आमच्‍यामधले सर्व काही संपले.

उदयसिंह गौरी

करण कुंद्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कृतिका कामरा उदय सिंह गौरीच्या प्रेमात पडली. बॉलिवूड स्टार्सचा इव्हेंट मॅनेजर असलेल्या उदय सिंहने कृतिकाचे काम सांभाळायला घेतल्यापासून दोघांमधील जवळीक वाढू लागली. मात्र, काही काळ डेट केल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला.

सिद्धार्थ बिजपुरिया

सिद्धार्थ बिजपुरियासोबतही कृतिका कामराचं नाव जोडले गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार कृतिका आणि सिद्धार्थ एकेकाळी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. सिद्धार्थला कृतिकासोबत लग्न करून सेटल व्हायचं होतं, पण अभिनेत्रीने लग्नापेक्षा करीअरला जास्त महत्त्व दिले, त्यामुळे दीड वर्षातच दोघेही वेगळे झाले.

जॅकी भगनानी

जॅकी भगनानी सध्या बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीतला डेट करत आहे, पण एकेकाळी त्याचे नाव कृतिका कामरासोबतही जोडले गेले होते. 2018 मध्ये अभिनेता जॅकी भगनानी ‘मित्रों’ चित्रपटात कृतिका कामरासोबत दिसला होता. चित्रपटाचे शुटिंग संपताच दोघांची नावे एकमेकांशी जोडली जाऊ लागली. अनेकदा ते एकमेकांसोबत दिसले. मात्र, हे नातेही फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले.

कृतिकाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘कितनी मोहब्बत है’ मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ती ‘प्यार का बंधन’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘रिपोर्टर्स’, ‘प्रेम या पहली चंद्रकांता’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली. याशिवाय कृतिका ‘झलक दिखला जा 7’, ‘जरा नच के देखा’ आणि ‘एमटीव्ही वेब्ड’मध्येही दिसली आहे.