‘नागिन’ची नायिक...

‘नागिन’ची नायिका निया शर्माने मुंबईत घेतले नवीन घर: बघा तिचा गृहप्रवेश (Nagin Girl Buys A New Home : Performs Griha Pravesh)

बोल्ड ॲन्ड ब्युटीफुल निया शर्माने मुंबईमध्ये नवीन घर विकत घेतले. या घराची पूजा व गृहप्रवेशाचे फोटो तिने चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये प्रसिद्ध केले आहेत.

Nagin Girl, Griha Pravesh

टेलिव्हिजन जगतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री निया शर्माने या क्षेत्रात ११ वर्षे पूर्ण केली. खडतर कष्ट करून तिने आपले नाव कमावले आहे. खतरों के खिलाडी सारख्या खतरनाक रिॲलिटी शो मधून प्रेक्षकांची मने काबीज करणाऱ्या नियाने आपल्या नवीन जागेत गृहप्रवेश केला.

इन्स्टाग्राम स्टोरीज वरून या समारंभाचे फोटो तिने शेअर केले आहेत. या निमित्ताने नियाने जो ड्रेस घातला आहे, त्यामध्ये तिचे रूप खुलून दिसते आहे.

Nagin Girl, Griha Pravesh

पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात निया फारच छान दिसते आहे. ती पूजा करताना दिसते आहे. पूजा केल्यानंतर नियाने आपल्या प्रेक्षकांना व्हिडिओद्वारे या घराची झलक दाखवली.

नियाने या घराला पांढरा रंग दिला आहे. घरातील प्रत्येक सामान, तसेच छत आणि जमीन देखील पांढऱ्या रंगात आहे.

Nagin Girl, Griha Pravesh

खिडक्या, भिंतींवर लावलेले मोठे आरसे आणि छताला लटकवलेली झुंबरे घराला आधुनिक रुप देत आहेत. तिच्या या घरातून मुंबईचे विहंगम दृश्य दिसत आहे.

नियाचा भाऊ, विनय शर्माने देखील सोशल मीडियावर आपल्या बहिणीच्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.