सुरभि चंदना शोधतेय काम, म्हणाली लग्न, वाढदिवस, ...

सुरभि चंदना शोधतेय काम, म्हणाली लग्न, वाढदिवस, मुंडनसाठी संपर्क करा(‘Naagin’ Surabhi Chandana is ready to dance in wedding parties and family events, Actress writes on social media- ‘Available for Shaadi, Janamdin, Mata ki Chauki…’)

टीव्हीवरील ‘नागिन’ या भूमिकेमुळे घराघरात पोहचलेली  सुरभी चंदना ही टीव्हीच्या टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सुरभीने तारक मेहता का उल्टा चष्मा मधून आपल्या करीअरला सुरुवात केली होती, त्यानंतर अनेक टीव्ही शोमध्ये काम करुन घराघरातून आपली ओळख निर्माण केली. पण सध्या तिच्याकडे कोणतेच काम नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच तिने सोशल मीडियावर काम देण्याची विनंती केली आहे. सुरभीचीही पोस्ट सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली सुरभी अनेकदा आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण नुकतीच अभिनेत्रीने अशी एक पोस्ट केली आहे, जी चर्चेत आली आहे. या पोस्टद्वारे सुरभीने चाहत्यांना ती लग्न, पार्टी आणि मुंजीत काम करण्यास तयार असल्याचे सांगितले.

सुरभी चंदनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात ती ढोलकीच्या तालावर थिरकत आहे. कदाचित हा कोणाच्या तरी लग्नाच्या वरातीचा व्हिडिओ असून त्यात ती एकटीच नाचताना दिसत आहे. पण या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने वेगळेच काहीतरी लिहिले आहे. व्हिडिओ शेअर करताना सुरभीने लिहिले, “लग्न, वाढदिवस, मुंज किंवा माता की चौकी इत्यादीसाठी उपलब्ध…. या सर्वांसाठी संपर्क करा.

आता चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की, सुरभीला काम मिळणे बंद झाले आहे की अजून काहीतरी… सुरभी नुकतीच ‘शेरदील शेरगिल’मध्ये दिसली होती. या शोमध्ये सुरभी चंदना सिंगल मदरची भूमिका साकारत होती. पण या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे अवघ्या चार महिन्यांत हा शो बंद झाला. यानंतर सुरभी कोणत्याही शोमध्ये दिसली नाही. तिची लेटेस्ट पोस्ट पाहून सुरभी कामाच्या शोधात असल्याचा अंदाज फॅन्स लावत आहेत.