टेलिव्हिजनवरील नागिन निया शर्माला नवरा म्हणून ह...

टेलिव्हिजनवरील नागिन निया शर्माला नवरा म्हणून हवा आहे असा राजकुमार (Naagin Nia Sharma Reveals, That What kind of Husband She Wants)

टेलिव्हिजनवरील नागिन मालिकेचे सध्या ६ वे पर्व सुरू आहे. आतापर्यंतच्या सगळ्या पर्वांमधील नागिनींमध्ये सौंदर्याबरोबरच बोल्डनेस आणि ग्लॅमरमध्ये निया शर्मा जास्तच भाव खाऊन जाते. निया आपले हॉट आणि सेक्सी अंदाजातील फोटो प्रदर्शित करून सोशल मीडियावर अक्षरशः आग लावते. नियाला पसंत करणाऱ्यांची संख्या अमाप आहे. तरीही नियाचे हृदय जिंकू शकेल अशा व्यक्तीची तिच्या जीवनात कमतरता आहे. निया ३२ वर्षांची झाली तरी तिला अजून तिच्या स्वप्नातील राजकुमार सापडलेला नाही. मात्र अलीकडेच एका मुलाखती दरम्यान नियाने तिला नवरा म्हणून कसा राजकुमार हवा आहे, हे स्पष्ट केले आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

हल्लीच्या हल्ली काही महिन्यांत टेलिव्हिजनवरील अनेक कलाकारांची लग्नं झाली. त्यांनी आपापल्या जोडीदारांसोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दरम्यान निया शर्माला तिचं लग्न आणि जोडीदाराबद्दल विचारले असता, तिने विस्तृतपणे याबद्दल सांगितले. आपल्या एका मुलाखतीत नियाने तिला लव्ह मॅरेज करायचं आहे की अरेंज मॅरेज याबद्दलही खुलासा केला आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

नियाच्या लग्नाबाबत कुटुंबियांकडून कोणत्याही प्रकारची सक्ती नसल्याचे तिने सांगितले आहे. म्हणूनच निया स्वतःच्या लग्नाबाबत कोणत्याही प्रकारची घाई करु इच्छित नाही. आपल्याला कसा राजकुमार हवा हे सांगताना ती म्हणते की, जोपर्यंत कोणी तिला येऊन असे सांगत नाही की तो तिची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी तयार आहे. तोपर्यंत ती कोणाशी लग्न करणार नाही. नियाला तिची सर्वोतोपरी काळजी घेणारा तसेच तिच्यासाठी काहीही करण्यास तयार असणारा राजकुमार हवा आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

कोणत्याही व्यक्तीच्या वरवरच्या गोड बोलण्याला भूलून आणि भावूक होऊन मला लग्न करायचं नाही, असं निया म्हणते. ती अतिशय विचारपूर्वक, योग्य वेळ आल्यावर, योग्य व्यक्तीशी लग्न करणार आहे. सध्या तरी निया आपलं बॅचलर लाइफ एन्जॉय करत आहे. शिवाय कुटुंबातील व्यक्तींकडूनही लग्नासाठी कोणतीही सक्ती नसल्याने ती याबाबत घाईघाईने निर्णय घेऊ इच्छीत नाहीये.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

आपल्या लग्नाबाबतचा खुलासा करताना निया म्हणते की, ती स्वतःच्या मर्जीने अर्थात लव्ह मॅरेज करू इच्छीते. मात्र त्यांचं लग्न साधं आणि डेस्टिनेशन वेडिंग असेल. हे डेस्टिनेशन वेडिंग एखाद्या शांत ठिकाणी असू शकेल. किंवा मग ती कोर्ट मॅरेज किंवा एखाद्या मंदिरात जाऊनही लग्न करेल.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

निया शर्मा पडद्यावर जेवढी बोल्ड अन्‌ ग्लॅमरस दिसते, तेवढीच बोल्ड अन्‌ बिनधास्त ती खऱ्या आयुष्यातही आहे. तिच्या या लूकमुळे तिने चाहत्यांची रात्रीची झोप उडवली आहे. तिचं सोशल मीडियावरील अकाऊंटही तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंनी भरलेलं आहे.