दिव्या अग्रवाल आणि वरुण सूदच्या बहिणीत ट्विटर व...

दिव्या अग्रवाल आणि वरुण सूदच्या बहिणीत ट्विटर वॉर..अभिनेत्याच्या बहिणीने दिव्याकडे परत मागितले आपले खानदानी दागिने (‘Na Kabhi Pehna Ma Kabhi Manga’ Says Divya Agarwal As Ex Varun Sood’s Sister Demands For The Family Jewellery And Accuses Divya Of Not Returning Their Khandani Gehne)

अभिनेत्री मॉडेल दिव्या अग्रवाल आपल्या वैयक्तिक आयुष्य आणि प्रेम प्रकरणांमुळे नेहमीच चर्चेत असते.  प्रियांक शर्मासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिचे वरुण सूदसोबतचे नाते निर्माण झाले. बराच काळ हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे सतत एकत्र राहणे, फिरणे पाहून ते लवकर विवाहबंधनात अडकतील असा अंदाज चाहत्यांनी लावला खरा पण पुढे तो चुकीचा ठरला. कारण गोष्टी लग्नापर्यंत जायच्या आतच त्यांचा ब्रेकअप झाला. यानंतर काही महिन्यातच दिव्याने आपल्या साखरपुड्याची बातमी देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

दिव्याने आपला बालमित्र अपूर्व पाडगांवकरसोबत साखरपुडा केला असून आता ती खूप आनंदी आहे.  दरम्यान, आता वरुण सूदची बहीण अक्षिता सूदने दिव्यावर आरोप केला आहे की, वरुणच्या कुटुंबाने दिलेले दागिने दिव्या परत देत नाही आहे. आता हे प्रकरण इतके वाढले की दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले आहे.

अक्षिताने ट्विट केले की, मी तिच्या मॅनेजरला 10-11 दिवसांपूर्वी मेसेज केला होता, त्याची प्रतिक्रिया आज का येत आहेत, माहित नाही. आम्ही काही बोलत नाही याचा फायदा घेणे बरोबर नाही ना..  यानंतर लोक दिव्याला ट्रोल करून कोणाच्याही घरातील दागिने ठेवू नयेत असे म्हणू लागले आहेत. तुझ्याही आजींनीही त्यांच्या सुनेसाठी जपून ठेवलं असेल, म्हणून त्यांनी त्या परत केल्या असाव्यात. त्याच वेळी, काही लोक अक्षिता लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहेत तसेच भेटवस्तू परत मागू नये  असे म्हणत आहेत.

दिव्यानेही अक्षिताला ट्विट करत उत्तर दिले. एका ट्विटमध्ये दिव्याने दागिन्यांचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले – मी दागिने परत करत आहे.  यासोबतच अभिनेत्रीने हसण्याचा एक इमोजी देखील पोस्ट केला आहे, म्हणजे खूप कमी दागिने आहेत तरी ते केवढे असल्यासारखा आव आणत आहेत असे दिव्याला दाखवायचे आहे… पण चाहत्यांना तिचे हे कृत्य आवडले नाही,ते म्हणाले की तुझ्याबद्दल जो काही आदर होता तो संपला आहे.  ही तुझ्यासाठी किरकोळ गोष्ट असेल, पण कोणाच्याही आजीची शेवटच्या आठवणीची अशी खिल्ली उडवू नये.  त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे, म्हणूनच ते तुला विचारत आहेत.  इतरांच्या भावनांची अशा प्रकारे थट्टा करू नकोस. लाज वाटली पाहिजे.

असे मेसेज वाचून दिव्याची चिडचिड झाली आणि तिने लिहिलेएक वर्षानंतर  तुला आठवले का???  मला जगू द्या भाऊ… माझी मॅनेजर हॉस्पिटलमध्ये आहे.

यानंतर एकाने ट्विट केले- तू एक सशक्त स्त्री आहेस, ते सर्व परत दे…तुला भूतकाळाची आठवण करून देणारे कोणतीही गोष्ट ठेवण्याची गरज नाही…फक्त भविष्याकडे पहा आणि ती सकारात्मकता तुझ्यावर वर्चस्व गाजवू दे…तू सर्व उत्तम गोष्टीसाठी पात्र आहेस.

दिव्याने यावर आणखी एक ट्विट केले – मला आठवतही नाही. मी त्यांच्याकडे ते कधीच मागितलेही नाही. मी ते कधी घातलेही केले नाही. जवळपास एक वर्ष झालं. माझी मॅनेजर ईशा हॉस्पिटलमध्ये आहे. त्यातही बिचारी मला फोन करून आठवण करून देत आहे, पण ते एवढे महत्त्वाचे होते तर दिलेच का?

काही चाहते दिव्याला पाठिंबा देत आहेत. दिव्याने असेही लिहिले की ती दागिन्यांसह चॉकलेट पाठवत आहे.